(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Amavasya 2024 Upay : आज वर्षातील शेवटची शनि अमावस्या; संध्याकाळी कुणालाही न सांगता गुपचूप करा 'हा' उपाय, साडेसाती होईल झटक्यात दूर
Shani Amavasya Upay : आज शनि अमावस्येचा दिवस आहे, हा दिवस आपल्यावर येणाऱ्या अडचणी आणि संकटं दूर करण्यासाठी प्रभावी मानला जातो. शनि अमावस्येला काही खास उपाय करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता.
Shani Amavasya Ke Upay : शनिवार हा कर्मदाता आणि न्यायाची देवता शनि महाराजांचा दिवस आहे आणि यात शनिवारी आलेली अमावस्या (Shani Amavasya 2024) ही खूप खास ठरते. आज 2024 वर्षातील शेवटची शनि अमावस्या आहे, हा दिवस शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष असतो. शनि अमावस्येच्या दिवशी शनीशी संबंधित उपाय (Shani Remedies) केल्याने शनिदोषापासून आराम मिळतो, साडेसाती दूर होते, मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात. पण हे उपाय कोणालाही न सांगता गुपचुप करावे. हे उपाय नेमके कोणते? जाणून घेऊया.
शनि अमावस्येला करा 'हे' उपाय
शनि अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, यामुळे शनिदोषापासून आराम मिळतो. तसेच शनिदेवाची कृपा अबाधित राहते. शनि अमावस्येला शनिदेवाच्या मंत्रांचा जप करावा, यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो.
या दिवशी शनि चालिसाचं पठण केल्यास शुभ फळ मिळतं. या दिवशी काळे तीळ, काळी छत्री, मोहरीचे तेल, काळे उडीद आणि शूज आणि चप्पल यांचं दान करावं, यामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि शनिदोषही कमी होऊ लागतात. मान्यतेनुसार, शनि अमावस्येच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने देखील शनिदेव प्रसन्न होतात.
शनिवारी करा शनीची पूजा
आठवड्यातील शनिवारचा दिवस हा शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. या दिवशी शनीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखं कमी होतात, कामात येणारे अडथळे आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. शनीच्या शुभ प्रभाव असल्यास माणूस यशाकडे वाटचाल करत राहतो. पण हेच जर, शनि दोष किंवा शनीची साडेसाती मागे लागली तर केलेलं कामही बिघडतं. तसेच व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो, त्यामुळे शनि दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. या काळात काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात.
शनिदेवाची पूजा पद्धत
शनिदेवाची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं. शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्याच्या मूर्तीजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यावेळी त्यांना निळी फुलं, काळे उडीद, काळे कापड, काळे तीळ अर्पण करा. नंतर पुन्हा मोहरीचे तेल अर्पण करा. असं मानलं जातं की, शनिवारी शनिदेवाला गोड पुरी अर्पण करावी, यामुळे तो खूश आहे. यानंतर काळ्या तुळशीची जपमाळ ठेवून 'ॐ शं शनैश्चराय नमः' मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर शनिदेवाची आरती सुरू करून पूजा संपवावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: