Scorpio Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा शुभ; उत्पन्नाच्या अतिरिक्त मार्गातून होणार धनलाभ? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Scorpio Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : नवीन आठवडा आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. तुमचं आरोग्य तुम्हाला साथ देईल. तुमच्या लव्ह लाईफमध्ये मात्र थोड्या समस्या निर्माण होतील.
Scorpio Weekly Horoscope 10th To 16th March 2024 : आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा चांगला असेल. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही उत्तम कामगिरी बजावाल, फक्त अनावश्यक वादापासून दूर राहा. या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. लव्ह लाईफमध्ये अडचणी येऊ शकतात. एकूणच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (Scorpio Love Horoscope)
ज्यांचा अलीकडेच ब्रेकअप झाला आहे, असे लोकांच्या आयुष्यात आज एका खास व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते. जे लोक टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहे, त्यांना नात्यात गुदमरल्यासारखं वाटू शकतं. काहींचे आधीच्या प्रियकरासोबतचे वाद दूर होतील. जे बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत आहेत, ते पुढे लग्नाचा विचार करू शकतात. तुमच्या जोडीदाराला घरातल्यांशी भेटवू शकता.
वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Career Horoscope)
तुम्ही या आठवड्यात ऑफिसमध्ये अनावश्यक वादांपासून दूर राहा. नोकरीत तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. मात्र, जे नुकतेच नवीन नोकरीत रुजू झाले आहेत त्यांना थोडी मेहनत करावी लागेल. अतिरिक्त जबाबदान्या घेण्यास अजिबात संकोच करू नका. या आठवडयात व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याच्या असंख्य संधी मिळतील. तुम्ही ग्राहकांना जोडून ठेवलं पाहिजे, ग्राहकांशी बोलताना तुमच्या संवाद कौशल्याचा पुरेपूर वापर करा.
वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला पैशांशी संबंधित फार अडचणी येणार नाहीत. तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून आर्थिक लाभ होईल. वृश्चिक राशीचे काही लोक वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित कायदेशीर वादात विजयी होतील, कोर्टाची केस तुमच्या बाजूने लागू शकते. मात्र, यात लागणाऱ्या अतिरिक्त खर्चामुळे तुमचं मनही अस्वस्थ होईल. घरात एखादं शुभ कार्य निघेल, ज्याचं आयोजन करताना तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. या आठवड्यात तुम्ही थकित कर्ज फेडू शकता.
वृश्चिक राशीचे आरोग्य (Scorpio Health Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात आरोग्याबाबत गाफील राहू नये. या आठवड्यात काही लोकांना छातीत दुखण्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. महिलांना दमा किंवा ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. प्रवास करताना तुमचं मेडिकल किट सोबत ठेवा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. या आठवड्यात महिलांना स्त्री रोगांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: