एक्स्प्लोर

Sagittarius Weekly Horoscope : धनु राशीसाठी दिवाळीचा आठवडा किती खास? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Sagittarius Weekly Horoscope 28 October to 03 November : धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंधांच्या दृष्टीने किती खास असणार आहे? धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Sagittarius Weekly Horoscope 28 October to 03 November : हिंदू कॅलेंडरनुसार, नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा धनु राशीसाठी नेमका कसा असणार आहे? धनु राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा धनु राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

धनु राशीची लव्ह लाईफ (Sagittarius Love Horoscope)

या आठवड्यात तुमच्या जोडीदाराशी तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करा. काही लोकांना नात्यात किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. लव्ह लाईफमधील समस्या हुशारीने सोडवा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी अनावश्यक वाद टाळा. धनु राशीच्या अविवाहितांसाठी हा आठवडा भाग्यवान ठरेल. येत्या काही दिवसात तुम्हाला कोणी खास व्यक्ती भेटू शकते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रपोज केलं तर सकारात्मक प्रतिसादही मिळेल.

धनु राशीचे करिअर (Sagittarius Career  Horoscope)

व्यावसायिक जीवनात अनावश्यक वादविवादांपासून दूर राहा. कार्यालयीन राजकारणात पडू नका. या आठवड्यात कलाकार, संगीतकार, अभिनेते, डिझायनर, राजकारणी, चित्रकार आणि कॉपी रायटर यांना करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. क्लायंट हाताळताना आव्हानं येऊ शकतात, पण धीर धरा. या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात. त्याच वेळी, आयटी, हॉस्पिटॅलिटी आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांचं वेळापत्रक खूप व्यस्त असेल.

धनु राशीचे आर्थिक जीवन (Sagittarius Wealth Horoscope)

उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल. जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल. काही लोक नवीन मालमत्ता किंवा घर घेण्याचा विचार करू शकतात. व्यावसायिकांना निधी गोळा करण्यात अडचणी येऊ शकतात, परंतु ग्राहक तुम्हाला आर्थिक मदत करू शकतो. परदेशातील ग्राहकही तुम्हाला आर्थिक मदत करतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope)

या आठवड्यात किडनीच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं. काही लोकांना उच्च रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉलची समस्या असू शकते. आरोग्यदायी सवयी अंगीकारा. दररोज योग आणि ध्यान करा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. नकारात्मकतेपासून दूर राहा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Scorpio Weekly Horoscope : वृश्चिक राशीसाठी दिवाळीचा आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bandra Railway Accident Special Report : प्रवाशांची गर्दी,चेंगरा-चेंगरी  वांद्रे स्टेशनवर काय घडलं?ABP Majha Headlines : 11 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 27 OCT 2024 ABP MajhaMaha Vikas Aghadi Special Report : पुण्यात ठाकरे गटाची शरद पवार गटावर नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
Embed widget