(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sagittarius Weekly Horoscope 27 Nov-3 Dec 2023: धनु राशीच्या लोकांना करावा लागेल समस्यांचा सामना; या आठवड्यात मित्रांसोबत फिरायला जाण्याचा योग, साप्ताहिक राशीभविष्य
Sagittarius Weekly Horoscope 27 Nov-3 Dec 2023: आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. प्रेमविवाहाच्या योजना यशस्वी होऊ शकतात. वैवाहिक जीवनात एकमेकांप्रती जबाबदारी वाढेल, ज्यामुळे नात्यात जवळीकता येईल.
Sagittarius Weekly Horoscope 27 Nov-3 Dec 2023: धनु राशीचे लोक या आठवड्याच्या सुरुवातीला (Weekly Horoscope) कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त राहतील. कामावर नवीन सहयोगी बनतील. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. न्यायालयीन खटला योग्य पद्धतीने मांडावा, अन्यथा काही समस्या उद्भवू शकतात. राजकारणात प्रचाराचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल.
व्यवसायात अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवू नका
व्यावसायिकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायात अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. फसवणूक होऊ शकते. कापड व्यवसायाशी संबंधित लोकांना प्रगती होईल. या आठवड्यात व्यावसायिक सहली तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तुमच्या व्यवसायाला या आठवड्यात नवी दिशा मिळेल. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात प्रगती होईल.
नोकरीत वरिष्ठ राहतील खुश
नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झालं तर, या आठवड्यात तुम्ही तुमचं काम एकाग्र चित्ताने कराल. कोणाचं म्हणणं ऐकू नका. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल. तुमच्या समर्पण आणि कार्यशैलीने प्रभावित होऊन तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. या आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी खूप व्यस्तता राहील. नवीन सहयोगी बनतील.कला आणि अभिनय जगताशी निगडित लोकांना महत्त्वपूर्ण यश मिळेल. नोकरीत पदोन्नतीसह महत्त्वाची जबाबदारी मिळेल.
धनु राशीचे या आठवड्यातील कौटुंबिक जीवन
प्रेमविवाहाच्या योजना यशस्वी होऊ शकतात. आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. वैवाहिक जीवनाचं बोलायचं झालं तर, तुम्ही एकमेकांप्रती जबाबदार व्हाल, ज्यामुळे नात्यात जवळीक येईल. आठवड्याच्या मध्यात बाहेरच्या व्यक्तीवरुन कुटुंबात विनाकारण वाद होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील वरिष्ठांचा आदर करा. त्यांना दुखावलं जाईल असं काहीही बोलू नका. आठवड्याच्या शेवटी कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. पाहुणे येतील. काही शुभ कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली जाईल. अध्यात्मिक कार्यात रुची राहील. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल.
धनु राशीचं या आठवड्यातील आरोग्य
आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्य चांगलं राहील. कोणतीही गंभीर स्थिती असलेल्या लोकांना आराम मिळेल. सकारात्मकता वाढेल. आठवड्याच्या मध्यात कामाच्या ठिकाणी अनावश्यक धावपळ केल्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना सतर्क आणि सावध राहावे लागेल, अन्यथा समस्या वाढू शकतात. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चांगल्या डॉक्टरांचा सल्ला मिळेल, ज्यामुळे तुम्ही लवकर बरे व्हाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. नियमित योगासने आणि प्राणायाम करा. पौष्टिक आहार घ्या. जास्त वेगाने वाहन चालवू नका. अपघात होण्याची शक्यता आहे.
धनु राशीसाठी उपाय
सत्यनारायणाची पूजा करुन घ्या. ब्राम्हणा चण्याची डाळ, वस्त्र, दक्षिणा दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :