एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ramlala Pran Pratishtha at home : आज घरीच रामललाची पूजा कशी करावी? जाणून घ्या विधी आणि साहित्य

Ramlala Pran Pratishtha : देशभरातील अनेक जण अयोध्येतील राम मंदिरात होत असलेल्या प्राणप्रतिष्ठेसाठी उत्सुक आहेत. रामाचं लोभस रुप पाहण्यासाठी सर्व आतुरले आहेत. बरेच जण घरी बसून टीव्हीवर हा सोहळा पाहतील. ज्यांना हा सोहळा अनुभवण्यासाठी अयोध्येला जाणं शक्य नाही, ते घरीच रामाची पूजा करू शकतात. कशा प्रकारे? जाणून घेऊया.

Ramlala Pran Pratishtha At Home : जगभरातील हिंदूचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांची आज, म्हणजेच 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. बालस्वरूप असलेल्या रामलालाच्या मूर्तीची अभिषेकासह प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशासाठी आजचा दिवस उत्सव पर्व आहे. प्रत्येक रामभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता. 22 जानेवारी 2024 हा रामभक्तांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. ज्या दिवसाची सर्व राम भक्त वर्षानुवर्षे वाट पाहत होते, तो दिवस अखेर आला आहे.

काही जण या सोहळ्यासाठी अयोध्येत गेले आहेच. तर काही जण घरुनच ऑनलाईन हा सोहळा बघणार आहे. तर काही जण या दिवशी आपल्या घरात प्रभू श्रीरामाची मूर्ती (Ram) स्थापन करणार आहे. जर तुम्ही अयोध्येला जाऊ शकत नसाल, तर रामललाच्या अभिषेक दिनी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही घरी कोणत्या पद्धतीने त्यांची पूजा करू शकता? जाणून घ्या.

पूजेसाठी घरी आणा या वस्तू

सर्वप्रथम घरी रामललाची मूर्ती किंवा फोटो आणा. पूजेचं ताट तयार करा. त्यात अक्षता, हळद, कुंकू, चंदन, फुलं, हार, अगरबत्ती, साजूक तूप किंवा तेलाचा दिवा, फळं आणि प्रसादासाठी मिठाई ठेवा. आरतीसाठी कापूर आणि फुलं, दिवा, घंटा आदी गोष्टी तयार ठेवा.

अशी करा पूजेची तयारी

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेआधी तुम्ही तुमच्या घरातील मंदिराची साफसफाई करा. तुमच्या घरातील देव्हाऱ्याची देखील साफसफाई करा, त्यात कोणताही फाटलेला जुना फोटो किंवा इतर खराब झालेलं साहित्य राहणार नाही, याची काळजी घ्या. अंघोळ करुन देव्हाऱ्यातील देवांनाही स्वच्छ करा. चांगले कपडे परिधान करुन पूजेला सुरुवात करा.

अशा प्रकारे करा पूजा सुफळ-संपन्न

प्रथम रामाच्या मूर्तीला जलाभिषेक करुन पंचामृताने न्हाऊ घाला. मूर्तीला फुलं अर्पण करा. तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी. कुंकू, अक्षता, चंदन, फुल, फळं, मिठाई, पंचामृत, खीर रामाला अर्पण करावी. शेवटी कापूर पेटवावा आणि आरती करावी. श्रीराम सोबतच हनुमानजींचीही पूजा करायला विसरू नका. यानंतर हनुमान चालीसा, रामचरितमानस किंवा किमान सुंदरकांड पाठ नक्की करा. शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Pisces Weekly Horoscope 22 to 28 January 2024: मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा यशाचा; मिळेल मेहनतीचं फळ, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूकAjit Pawar on Chief Minister : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांसाठी कुणी लावली फिल्डिंग?Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Embed widget