Rahu Transit : राहू ग्रहाने आपली चाल बदलली; 'या' 3 राशींना 2025 पर्यंत राहावं लागणार सांभाळून, बसणार आर्थिक फटका
Rahu Transit In Meen : ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला अशुभ ग्रह मानलं जातं. सध्या राहू मीन राशीत विराजमान आहे, या काळात 3 राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
Rahu Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात (Astrology) राहूला अशुभ ग्रह मानलं जातं. साधारणपणे कुंडलीत राहूचं नाव ऐकताच लोकांच्या मनात भीती निर्माण होते. राहू व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करतो. राहू सुमारे 18 महिने एका राशीत राहतो, सध्या तो मीन राशीत आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहूने (Rahu) मीन राशीत प्रवेश केला होता. तो मे 2025 पर्यंत या राशीत राहणार आहे. यानंतर तो कुंभ राशीत प्रवेश करेल.
राहू मीन राशीत असल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल, तर अनेक राशीच्या लोकांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. नेमक्या कोणत्या राशीच्या लोकांना 2025 पर्यंत थोडं सावध राहण्याची गरज आहे? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी राहू फारसा अनुकूल राहणार नाही . या राशीच्या लोकांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. अनावश्यक खर्चामुळे तुम्ही त्रस्त राहू शकता. यासोबतच व्यवसायात कोणतेही काम थोडा विचार करून करा, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. यासोबतच काही मुद्द्यावरून कुटुंबात मतभेद होऊ शकतात. तुमच्या आरोग्याबाबत थोडं सावध राहा, काही जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. कायदेशीर बाबींबाबत तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता, त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे.
कन्या रास (Virgo)
राहू या राशीच्या सातव्या घरात स्थित आहे, त्यामुळे या काळात या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. मित्रांसोबत काही कारणावरून वाद होऊ शकतो, अशा परिस्थितीत तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच तुम्ही तुमचा अहंकार कमी करावा, कारण यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. कामात काही अडथळे येऊ शकतात. करिअर आणि आर्थिक परिस्थितीवर फारसा प्रभाव पडणार नाही.
धनु रास (Sagittarius)
या राशीच्या चौथ्या घरात राहू असणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये घट होऊ शकते. यासोबतच आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. तुम्हाला मानसिक आणि शारीरिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. म्हणून, अनावश्यक राग टाळण्याचा प्रयत्न करा. ऍलर्जीसह काही आरोग्य समस्या असू शकतात, कुटुंबात काही कायदेशीर समस्या किंवा मालमत्तेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो. नोकरदार आणि व्यावसायिकांनीही थोडं सावध राहणं आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev : 'या' 10 गोष्टींचं पालन करणाऱ्यांना शनि कधीच देत नाही त्रास; वेळ आल्यावर देतो भरघोस सुख