एक्स्प्लोर

Shani Dev : 'या' 10 गोष्टींचं पालन करणाऱ्यांना शनि कधीच देत नाही त्रास; वेळ आल्यावर देतो भरघोस सुख

Shani Dev: शनि हा स्वभावाने वाईट नाही, तर त्याला शिस्त आवडते. याच कारणामुळे शनीला कलियुगाचा न्यायाधीश म्हटलं जातं. वाईट कर्म करणाऱ्याला शनि वाईट फळ देतो. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही 10 गोष्टींचं पालन केलं पाहिजे. याबद्दल अधिक जाणून घेऊया.

Shani Dev : कुंडलीत शनि (Shani) शुभ स्थानी असेल याची विशेष काळजी घेतली जाते. कुंडलीत शनि अशुभ स्थितीत असेल तर त्याचा व्यक्तीच्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतो, व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, व्यक्तीचं जीवन दुःखांनी भरलेलं असतं. ज्यांच्या कुंडलीत शनि अशुभ स्थानी असतो, त्यांनी जीवनात कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. यामुळेच शनीती साडेसाती आणि शनिच्या महादशेवर अनेक उपाय केले जातात, अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. याबद्दलच जाणून घेऊया.

शनि नेमका कोण आहे? (Who Is Shani?)

शास्त्रात शनिला सूर्यपुत्र म्हणून ओळखलं जातं. पौराणिक कथेनुसार, शनीला कधी वडिलांची साथ मिळत नाही. ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायदेवता म्हटलं जातं, जो मनुष्याला त्याच्या कर्माच्या आधारे चांगलं किंवा वाईट फळ देतो. शनीला कर्माचा दाता देखील म्हटलं जातं.

शनिदेवाला घाबरण्याची गरज नाही. जर तुम्हाला शनीचा स्वभाव माहित असेल तर शनीची कृपा मिळवणं तुमच्यासाठी सोपं होईल.  

शनीच्या वाईट दृष्टीपासून कसं वाचायचं? (What To Do If Shani Dev Is Angry?)

अनेकदा लोकांचा असा समज असतो की, शनीच्या वक्रदृष्टीत आपण शनीला मोहरीचं तेल अर्पण करुन त्याला शांत करू शकतो. पण तसं नसतं. शनीचे उपाय तेव्हाच फलदायी ठरतात, जेव्हा तुम्ही तुमचं आचरण शुद्ध ठेवता, तुमची वागणूक चांगली ठेवता. शनीला खुश करण्याचे काही महत्त्वाचे उपाय जाणून घेऊया.

1. गरिबांना त्रास देऊ नका (Help Poor Person)

शनिदेव दुर्बल आणि असहाय्य लोकांचे प्रतिनिधित्व देखील करतात. जे गरजू किंवा गरीब लोकांचं भलं करतात, त्यांच्यावर शनीची कृपादृष्टी सदैव राहते. 

2. प्रकृतीची सेवा (Nature Care)

प्रकृती सुधारण्यात हातभार लावणाऱ्या लोकांनाही शनि विशेष आशीर्वाद देतो, त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची काळजी घेतली पाहिजे. झाडांची निगा राखली पाहिजे. प्राण्यांची सेवा केली पाहिजे, यामुळेही शनि प्रसन्न होतो.

3. पैशाचा वापर इतरांना उध्वस्त करण्यासाठी करू नका (Use Money For Welfare)

शनि फार शिस्त प्रिय आहे, त्याला नियमांचं पालन केलेलं आवडचं. वेळ आल्यावर शनि नियमांचं पालन न करणाऱ्यांना कठोर शिक्षा देतो. जे लोक पैसे मिळाल्यावर त्याचा दुरुपयोग करतात, इतरांचं नुकसान करण्यासाठी पैसे खर्च करतात, अशा लोकांना शनि कधीही माफ करत नाही. त्यासाठी आपला पैसा लोककल्याणासाठी वापरला पाहिजे.

4. इतरांचे हक्क हिरावून घेऊ नका (Respect Human Rights)

शनी कर्माचा फळ देणारा आहे. इतरांचे हक्क हिरावून घेणाऱ्या लोकांना शनिदेव शिक्षा देतात. कोणाचेही हक्क आणि अधिकार हिरावून घेऊ नका, असं केल्याने शनीचा कोप होतो.

5. आपल्या पदाचा अभिमान बाळगू नका (Do not keep attitude of your position)

ज्या लोकांना आपल्या शक्तीचा आणि पदाचा अभिमान असतो, अशा लोकांचा घमंड शनि उतरवूनच राहतो. अशा लोकांच्या मागे शनीची साडेसाती लागते, शनीची महादशा लागते.

6. गंभीर संकटात असलेल्यांना मदत करा (Help those in dire straits)

जर कोणी गंभीर संकटात असेल, दुःखात असेल आणि त्याला मदतीची गरज असेल, तर अशा लोकांना मदत करा. जे लोक संकटात असलेल्या व्यक्तींना किंवा प्राण्यांना मदत करतात, त्यांच्यावर शनि अत्यंत प्रसन्न असतो. वेळ आल्यावर शनि अशा लोकांना अपार सुख देतो.

7. कुष्ठरुग्णांची सेवा करा (Serve lepers)

जे लोक कुष्ठरुग्णांची सेवा करतात, त्यांच्यासाठी औषधं नेतात, त्यांना मलमपट्टी वैगेरे करतात, त्यांच्यावर शनिदेव सदैव आपला आशीर्वाद ठेवतो.

8. जिथे पाण्याची समस्या आहे तिथे पाणी दान करा (Donate water where there is water problem)

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी जे लोक गरजेच्या ठिकाणी तलाव किंवा नळ बसवतात, प्राणी-पक्ष्यांना पाणी ठेवतात, अशा लोकांना शनि विशेष आशीर्वाद देतो.

9. नियमांचे पालन करा (Follow Rules)

नियम पाळणाऱ्यांना शनि कधीही त्रास देत नाही. नियम आणि कायदे कधीही मोडू नयेत. नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्यांना शनि कठोर शिक्षा देतो.

10. मादक पदार्थ घेऊ नका (Do not take drugs, liquors)

सुखी जीवनासाठी माणसाने नशा करू नये. कोणत्याही प्रकारची नशा करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात शनि दु:ख देतो. अशा लोकांची सर्व सुख-शांती शनिदेव हिरावून घेतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : अवघ्या 4 दिवसांत शनि आणि शुक्राची युती! 'या' 5 राशींचं नशीब फळफळणार; होणार धनलाभ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget