Rahu Chandra Yuti 2025 : घातक, शक्तिशाली, मायावी राहू ग्रह बनवतोय ग्रहण योग; 10 ऑगस्टपासून 'या' 3 राशी असतील डेंजर झोनमध्ये
Rahu Chandra Yuti 2025 : शास्त्रानुसार, मायावी राहू ग्रह दर दीड वर्षांनी राशी परिवर्तन करतात आणि नेहमीच वक्री चाल चालतात. यामुळे 10 ऑगस्ट रोजी भयानक ग्रहण योग बनणार आहे.

Rahu Chandra Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, क्रूर आणि पापी ग्रह राहू (Rahu) सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. यामुळे 10 ऑगस्ट रोजी भयानक ग्रहण योग बनणार आहे. यामुळे 3 राशींना प्रचंड नुकसान होणार आहे.
शास्त्रानुसार, मायावी राहू ग्रह दर दीड वर्षांनी राशी परिवर्तन करतात आणि नेहमीच वक्री चाल चालतात. याच चालीत राहू ग्रहाने संक्रमण करुन कुंभ राशीत प्रवेश केला आहे. येत्या 10 ऑगस्ट रोजी कुंभ राशीत चंद्र ग्रहात प्रवेश करणार आहे.
10 ऑगस्ट रोजी चंद्राने कुंभ राशीत संक्रमण करुन ग्रहण योग निर्माण होणार आहे. खरंतर, कुंभ राशीत राहू ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. राहू आणि चंद्राच्या युतीने ग्रहण योग निर्माण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हा सर्वात अशुभ ग्रहांपैकी एक आहे. ग्रहण योगामुळे 3 राशींना प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे या काळात काही राशींनी सावधान राहण्याची गरज आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहण योग फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच, काही अडचणी तुमच्यासमोर येऊ शकतात. त्यामुळे निष्काळजीपणा करु नका. वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच, या काळात कोणतंही शुभ कार्य हाती घेऊ नका.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
हा ग्रहण योग वृश्चिक राशीसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुमचे शत्रू ग्रह तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला दुखापत देखील होऊ शकते. या काळात कोणाशीही पैशांचा व्यवहार करु नका.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी ग्रहण योग फार अशुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रचंड धनहानी होऊ शकते. तसेच, तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या काळात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. प्रवासा दरम्यान तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या काळात शक्यतो प्रवास करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















