Numerology Today 17 January 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी लाभदायक; वैवाहिक जीवन बहरणार, कामातही होईल प्रगती
Numerology Today 17 January 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.
Numerology Today 17 January 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. आजचा दिवस मूलांक 1 च्या लोकांसाठी खास असणार आहे. करिअर जीवन थोडे व्यस्त असू शकते. संध्याकाळी प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नका. खर्च करताना काळजी घ्या. तुमच्या आर्थिक परिस्थितीवर लक्ष द्या.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर सुरक्षित प्रवास करा. शैक्षणिक क्षेत्रात आज तुमचा मान-सन्मान मिळेल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. बरेच दिवसांपासून एखाद्या आजारांनी त्रस्त लोकांची स्थिती सुधारेल.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि आर्थिक लाभही होईल. त्याच वेळी, अतिरिक्त खर्च देखील होईल. जास्त ताण घेऊ नका आणि कामाचा ताण घरी आणू नका. जास्त जंक फूड खाऊ नका.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मालमत्तेचे कोणत्याही प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. 4 मूलांकाचे विद्यार्थी आज अभ्यासात चांगली कामगिरी करतील आणि त्यांचा नावलौकिक वाढवतील. आज तुम्हाला एखादी चांगली व्यक्ती भेटेल, त्या व्यक्तीशी तुम्ही मन भरुन बोलू शकता.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करू शकता, ज्यामुळे आर्थिक फायदाही होईल. आज तुमच्यामध्ये आत्मविश्वास राहील. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराला वेळ देणे गरजेचे आहे. आज जंक फूड खाऊ नका. तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. तुमच्या लाईफ पार्टनरशी काही मतभेद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवणे चांगले राहील. तुम्हाला कौटुंबिक सदस्याला आर्थिक मदत करावी लागेल, ज्यामुळे आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. तुम्ही कोणत्याही मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. आज किरकोळ आजार वाढू शकतात, त्यामुळे सतर्क राहा. ऑफिसमध्ये प्रलंबित समस्या ओझं ठरू शकते. घरगुती गोष्टी योग्यरित्या हाताळण्याची आवश्यकता पडू शकते.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असलेल्या लोकांनी आज स्वत:वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीत चढ-उतार असतील. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्हाला कामाचा खूप ताण वाटत असेल तर काही काळ ब्रेक घ्या.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. तुम्हाला तुमच्या आर्थिक गोष्टींवर बारकाईने नजर ठेवण्याची आवश्यकता असू शकते. तुमचं आरोग्य आज चांगलं असेल आणि तुम्हाला उत्साही देखील वाटेल. कुटुंबातील सदस्याशी चांगले वागा. आज तुम्ही लांबचा प्रवास कराल. मालमत्ता खरेदीबाबत तुम्ही गंभीर असू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Bornhan : मकर संक्रांतीच्या काळात लहान मुलांना बोरन्हाण का घालतात? यामागील कारण जाणून घ्या