Numerology : गडगंज श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेच्या लोकांकडे पैशांची कमी नसते. या व्यक्ती फार हुशार असतात, पैसा कमावण्यात देखील ते आपल्या हुशारीचा वापर करतात.
![Numerology : गडगंज श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट Numerology Mulank 6 people are so rich and smart theu know how to earn money in different way know their nature Numerology : गडगंज श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/07/51bf37168cde1d6a005013b9b30d9c6c1723017566574713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Numerology Of Mulank 6 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 6 असलेल्या लोकांबद्दल काही खास वैशिष्ट्यं सांगितली गेली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो.
मूलांक 6 असलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व खूप खास असतं. मूलांक 6 चा स्वामी शुक्र आहे. 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या मुलांवर शुक्राचा प्रभाव असतो. या जन्मतारखेच्या व्यक्ती फार श्रीमंत असतात, त्यांना कधी पैशाची कमी जाणवत नाही. शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक जीवनात खूप नाव आणि पैसा कमावतात. या मूलांकाशी (Numerology) संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
खूप पैसा कमावतात या जन्मतारखेचे लोक
6, 15 किंवा 24 जन्मतारखेचे लोक आयुष्यात भरपूर पैसा कमावतात. त्यांना उभ्या आयुष्यात कधी पैशाची कमी भासत नाही, संपत्तीची कमतरता भासत नाही. त्यांची आर्थिक स्थिती खूप चांगली असते. हे लोक डोक्याने फार स्मार्ट असल्याने कामात देखील ते त्यांच्या स्मार्टनेसचा वापर करतात. पैसे कसे कमवायचे हे त्यांना बरोबर माहीत असतं. या व्यक्तींकडे एकाहून अधिक उत्पन्नाचे स्रोत असतात.
कमावतात मोठं नाव आणि प्रसिद्धी
मूलांक 6 च्या लोकांना त्यांच्या आयुष्यात चांगली प्रसिद्धी मिळते, अर्थात यासाठी ते लोक तितकीच मेहनत देखील घेतात. मूलांक 6 चे लोक ज्या क्षेत्रात काम करतील तिथे चांगलं नाव कमावतात. समाजात देखील त्यांना विशेष मान दिला जातो.
दिसायला आकर्षक असतात या व्यक्ती
मूलांक 6 चा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा प्रेम आणि शांतीचा प्रतीक मानला जातो. मूलांक 6 च्या व्यक्ती दिसायला आकर्षक, सुंदर असतात आणि शारिरीकदृष्ट्या मजबूत असतात. या लोकांना म्हातारपण लवकर येत नाही. हे लोक कलाप्रेमींकडे आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात. 6, 15 किंवा 24 जन्मतारखेच्या व्यक्ती फार रोमँटिक देखील असतात.
जोडीदाराला ठेवतात नेहमी खुश
हे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवतात. ते त्यांच्या रिलेशनमध्ये एक स्पार्क जागा ठेवतात. जोडीदाराच्या पडत्या काळात ते खंबीर उभे राहतात आणि साथ देतात. जोडीदाराच्या दु:खात ते त्याची सोबत देतात आणि तिला शांत करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)