Numerology : अत्यंत बालिश असतात 'या' जन्मतारखेची मुलं; कितीही मोठे झाले तरी यांचा अल्लडपणा जात नाही, प्रत्येक गोष्ट सांगावी लागते समजावून
Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार, या जन्मतारखेची मुलं वयाने कितीही वाढली तरी यांची वागणूक बालिश असते. ही मुलं कधीच सिरीयस मूडमध्ये नसतात, त्यांना प्रत्येक गोष्ट दहा वेळा समजावून सांगावी लागते.
Numerology Mulank 5 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 5 असलेल्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
मूलांक 5 ची मुलं ही स्वभावाने अत्यंत बालिश असतात. कितीही मोठी झाली तरी ही मुलं लहान मुलांसारखीच वागतात. त्यांना प्रत्येक गोष्ट ही नीट समजावून सांगावी लागते, तेव्हा कुठे ही मुलं गोष्टी नीट समजून घेतात. ही मुलं स्वभावाने हट्टी देखील असतात. मूलांक 5 वर बुध ग्रहाचं राज्य आहे, या क्रमांकाचा ग्रह बुध आहे, त्यामुळे ते स्वभावाने निर्मळ असतात. 5, 14 किंवा 23 जन्मतारखेची मुलं नेहमी आनंदी असतात. मूलांक 5 शी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
कितीही वय वाढलं तरी बालिशपणा राहतो कायम
मूलांक 5 ची मुलं स्वभावाने अत्यंत बालिश असतात. त्यांचा खोडसाळपणा हा नेहमी सुरुच असतो. प्रत्येक गोष्टीसाठी ते अतिउत्साही असतात. त्यांना कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नसतं, या मुलांना एक गोष्ट दहा वेळा समजून सांगावी लागते. या मुलांचं मन मात्र निर्मळ असतं, ते कधीही कुणाविषयी वाईट चिंतत नाहीत.
खूप बोलकी असतात ही मुलं
5, 14 किंवा 23 जन्मतारखेची मुलं ही खूप बोलकी असतात. यांच्या तोंडाचा पट्टा कायम सुरू असतो. सतत बडबड करण्याची त्यांना सवय असते. एखाद्या शांत माणसालाही ते बोलण्यास भाग पाडतात. ही मुलं इतरांवर अगदी सहज छाप पाडू शकतात. कधी कधी यांच्या अति बडबडीमुळे समोरच्याचं डोकं दुखतं.
नेहमी आनंदी राहतात
मूलांक 5 ची मुलं कधीच कसलं टेन्शन घेत नाही. ते एकदम बिनधास्त राहतात. कधीच मनात काही ठेवत नाहीत. जे आहे ते तोंडावर सहजपणे बोलून टाकतात. प्रतिकूल स्थितीवर हसत हसत मात करण्याची कला त्यांच्याकडे असते, म्हणूनच ते नेहमी आनंदी राहतात.
बायको आणि कुटुंबातील लोकांसाठी ठरतात भाग्यवान
अंकशास्त्रानुसार, ज्या मुलांचा मूलांक 5 असतो, ती मुलं पत्नी आणि घरच्यांसाठी भाग्यवान समजले जातात. तसेच ही मुलं खुल्या मनाचे असतात. ही मुलं त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जातात. शिवाय, त्या त्यांच्या जोडीदाराला पावलोपावली साथ देतात आणि प्रत्येक कामात मदत करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :