Numerology : लाखात एक असतात 'या' जन्मतारखेच्या मुली; माहेरच नाही, तर सासरही गाजवतात
Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार, मूलांक 5 च्या मुली या आपल्या स्वभावाने समोरच्याचं मन जिंकण्यात एक्सपर्ट असतात. त्याच बरोबर, या जन्मतारखेच्या मुली प्रत्येक काम मन लावून करतात.
Numerology Mulank Number 5 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतं. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन (Numerology) त्या व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी समजतात. एखाद्याला वैवाहिक जीवनाबद्दल आणि त्यांचा जोडीदार कसा असेल हे देखील जन्मतारखेवरुन कळू शकतं. आज अशा काही जन्मतारखांच्या मुलींबद्दल जाणून घेऊया, ज्या त्यांच्या पती आणि सासरच्यांसाठी भाग्यवान मानल्या जातात.
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या मूलांकावर बुध ग्रहाचं राज्य आहे, या क्रमांकाचा ग्रह बुध आहे, त्यामुळे या मूलांकाच्या मुली सासरच्या घरावर राज्य करतात आणि या मुली मोकळ्या मनाच्या असतात. आई-वडिलांच्या घराव्यतिरिक्त त्यांना सासरकडून आणि पतीकडून खूप प्रेम मिळतं. या मूलांकाच्या मुलींबद्दल अधिक जाणून घेऊया.
पती आणि सासरच्या लोकांसाठी ठरतात भाग्यवान
अंकशास्त्रानुसार ज्या मुलींची मूलांक संख्या 5 आहे, त्या मुली पती आणि सासरच्यांसाठी भाग्यवान समजल्या जातात. तसेच या मुली सासरच्या घरात राज्य करतात, या मुली खुल्या मनाच्या असतात. आई-वडिलांच्या घराव्यतिरिक्त त्यांना सासरच्यांकडून आणि पतीकडून खूप प्रेम मिळतं. या मुली त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जातात. शिवाय, त्या त्यांच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून चालतात. 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या मुली आनंदी असतात, त्या खूप बोलक्या असतात. तसेच, ते त्यांच्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला पटकन प्रभावित करतात.
थोडा बालिशपणा कायम राहतो
मूलांक 5 असलेल्या मुली आयुष्यभर काही प्रमाणात बालिश राहतात. याशिवाय, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्या शांत राहतात. याशिवाय, त्या व्यवसायिक असतात आणि नवऱ्याला त्याच्या कामात आणि व्यवसायात सहकार्य करतात. त्याच वेळी, त्या व्यावहारिक देखील असतात आणि प्रत्येक काम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतात.
या मुलींसाठी हे दिवस अत्यंत शुभ
जर 5 मूलांकाशी संबंधित लोकांच्या शुभ अंकांबद्दल बोलायचं झालं तर, या लोकांसाठी 5, 14 आणि 23 नंबर अत्यंत शुभ आहे. म्हणजेच या तारखांना हे लोक काही शुभ कार्य सुरू करू शकतात. तसेच पांढरा, खाकी आणि फिके रंग त्यांच्यासाठी शुभ ठरतात. तर शुक्रवार आणि बुधवार त्यांच्यासाठी शुभ मानले जातात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :