Numerology: व्हॅलेंटाईन डे पूर्वी 'या' जन्मतारखेच्या लोकांना प्रेम मिळणार, बहरणार! तर 'या' लोकांची फसवणूक होणार? अंकशास्त्रात म्हटलंय..
Numerology: नात्यात प्रेम असणं खूप गरजेचं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आधी काही लोकांच्या लव्ह लाईफमध्ये प्रेम फुलू शकते. तर काहींना धोका मिळू शकतो. अंकशास्त्रात म्हटलंय..
Numerology: "प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं.." महान कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या या ओळी सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. प्रेम ही एक अशी भावना आहे, जी मनातून नाही, तर हृदयातून येते, त्यात अनेक भावना तसेच विविध विचार समाविष्ट असतात. तसं पाहायला गेलं तर जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रेमी-युगुलांसाठी तसेच जोडप्यांसाठी खूप खास असतो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लोक आपल्या जोडीदाराकडे आपले प्रेम व्यक्त करतात. ते त्यांना गुलाब, भेटवस्तू, चॉकलेट आणि कार्ड इत्यादी देतात. त्यांच्या मनातील भावना त्यांच्याशी शेअर करतात. बरेच लोक या दिवशी त्यांच्या आपल्या जोडीदारासोबत डेटवर जातात. मात्र, यंदा व्हॅलेंटाइन डेपूर्वी काही जोडप्यांचे प्रेम फुलू शकते. तर काहींना प्रेमात धोका मिळू शकतो? अंकशास्त्रात काय म्हटलंय? जाणून घ्या..
अंकशास्त्रात जन्मतारीख, मूलांकाला विशेष महत्त्व
न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्रामध्ये जन्मतारीख, मूलांक म्हणजेच डेस्टिनी क्रमांकाला विशेष महत्त्व आहे, ज्याच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व, प्रकृती, आरोग्य, आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ आणि भविष्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येतात. आज, अंकशास्त्राच्या मदतीने आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे नाते 2025 मध्ये व्हॅलेंटाईन डेपूर्वी मजबूत होईल. काही अविवाहित लोकांना त्यांचे खरे प्रेम सापडेल, तर जोडप्यांमध्ये सुरू असलेले मतभेद दूर होतील.
कोणत्या जन्मतारखेच्या लोकांचे प्रेम जीवन बहरणार?
अंकशास्त्रानुसार, व्हॅलेंटाईन डेच्या आधी कोणत्याही महिन्याच्या 2, 5, 6, 9, 12, 15, 18, 21, 25, 28 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात प्रेमाचे फूल फुलू शकते. जे पूर्वी विवाहित आहेत किंवा नातेसंबंधात आहेत, त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल. जोडप्यांमध्ये काही मुद्द्यावरून भांडण होत असेल, तर त्यावरही तोडगा निघेल. याशिवाय तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरसोबत रोमँटिक डेटवरही जाऊ शकता. जोडप्याला एकत्र क्वालिटी वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्याद्वारे ते आपल्या जोडीदाराला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम असतील. जे अविवाहित आहेत, त्यांच्या आयुष्यात विशेष व्यक्ती येण्याची दाट शक्यता असते.
View this post on Instagram
कोणत्या जन्मतारखेच्या लोकांची फसवणूक होणार?
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 4, 8, 11, 13, 15, 17, 20, 22, 24, 27, 29 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे हृदय स्वच्छ असते. हे लोक आपल्या लव्ह पार्टनरच्या सुखासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. ते त्यांच्या छोट्या-छोट्या गरजांची काळजी घेतात, पण तरीही त्यांची प्रेमात फसवणूक होते.
हेही वाचा>>>
Numerology: वैवाहिक जीवन उत्तम जगतात, 'या' जन्मतारखेचे लोक कोणालाही रहस्य सांगत नाहीत! अंकशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )