Numerology: 'या' जन्मतारखा एकमेकांच्या शत्रू का असतात? बऱ्याचदा लग्न टिकत नाही, इतक्या शत्रुत्वाचे कारण काय? अंकशास्त्रात म्हटलंय..
Numerology: अंकशास्त्रानुसार आज आम्ही अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल सांगणार आहे. जे एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जातात. बऱ्याचदा त्यांना लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो.

Numerology: आपण बऱ्याचदा पाहतो. कधी कधी, काही लोक लग्न तर करतात, पण ते फार काळ टिकत नाही, तसेच त्यांच्यामध्ये मोठे शत्रुत्व निर्माण होते, तर काही जणांची मैत्री टिकत नाही. काही जण एकमेकांच्या समोर जरी आले, तरी ते एकमेकांना पसंत करत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही मैत्री आणि शत्रुत्वाच्या कथा बऱ्याच ऐकल्या असतील, परंतु तुम्हाला माहिती आहे का, की ग्रह आणि संख्या देखील एकमेकांचे शत्रू आहेत. अंकशास्त्रानुसार आज आम्ही अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल सांगणार आहे. जे एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जातात. बऱ्याचदा त्यांना लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या त्या जन्मतारखांबद्दल..
'या' जन्मतारखांमध्ये इतके शत्रुत्व का?
अंकशास्त्रात असे सांगितले आहे की, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 रोजी जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो, 1 मूलांक असलेले लोक आणि मूलांक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 रोजी जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो) हे एकमेकांचे शत्रू असतात. हे दोघे एकमेकांना अजिबात पसंत करत नाहीत. हे लोक सहज मित्र बनत नाहीत. जरी ते मित्र झाले तरी भांडणे होण्याची शक्यता जास्त असते. या कारणास्तव, मूलांक १ आणि ८ असलेल्या लोकांना लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो. आता आपण जाणून घेऊया की मूलांक १ आणि ८ असलेले लोक मित्र का बनत नाहीत.
'या' जन्मतारखांमधील शत्रुत्वाचे कारण काय?
अंकशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य हा मूलांक 1 चा स्वामी मानला जातो, तर कर्माचा दाता शनि हा मूलांक 8 चा स्वामी आहे. सूर्य देव शनि देवाचा पिता आहे, परंतु या दोघांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे. सूर्य आणि शनि देव यांच्यातील शत्रुत्वाशी संबंधित अनेक कथा आहेत, ज्यांचे स्वतःचे महत्त्व आहे.
म्हणून या जन्मतारखा एकमेकांच्या कट्टर शत्रू आहे...
स्कंद पुराणानुसार, सूर्य देवाचा विवाह दक्षाची मुलगी संज्ञाशी झाला होता. देवी मनु, देवी यमुना आणि यमराज ही देवी संज्ञा आणि सूर्य देवाची मुले आहेत. देवी संज्ञा सूर्य देवाच्या तेजामुळे खूप नाराज होती. कंटाळून तिने सूर्य देवापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि हुबेहुब तिच्यासारखीच देवी स्वर्णा निर्माण केली. मनु, यमुना आणि यमराज यांची जबाबदारी देवी स्वर्णाला सोपवून आई संज्ञा तपश्चर्या करण्यासाठी निघून गेली.
देवी तपती, देवी भद्रा आणि शनिदेव ही सूर्यदेव आणि स्वर्णा देवी यांची मुले आहेत. जेव्हा देवी स्वर्णाने शनिदेवाला जन्म दिला तेव्हा सूर्यदेवाला शंका आली की ते त्यांचे मूल नाही. जेव्हा शनिदेवाला सूर्यदेवाच्या या संशयाची माहिती मिळाली तेव्हा त्यांना खूप राग आला. जेव्हा शनिदेवाची संतप्त नजर सूर्यदेवावर पडली तेव्हा तेही काळे झाले.
सूर्यदेव नेमकं काय घडत आहे ते समजू शकले नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सूर्यदेव शिवजींकडे गेले आणि महादेवाने त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली. सूर्यदेवांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी स्वर्णा देवीकडे माफी मागितली. परंतु त्यानंतर पिता-पुत्राचे नाते बिघडले.
असे मानले जाते की शनिदेवांनी सूर्यदेवांना कधीही क्षमा केली नाही. यामुळे आजही या दोघांमध्ये वैरभाव आहे. अंकशास्त्रानुसार 1 आणि 8 हे अंक सूर्य आणि शनिदेवांशी संबंधित आहेत. म्हणूनच या दोन अंकांचे लोक एकमेकांशी जुळत नाहीत.
हेही वाचा :
Shani Dev: अखेर शनिदेवांना 'या' 5 राशींवर दया आलीच! 18 ऑगस्टला शनि मार्ग बदलणार, टेन्शन मिटणार, संपत्तीत होणार वाढ..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















