Numerology: मैत्री उत्तम, मात्र 'या' जन्मतारखेच्या लोकांचे लग्न टिकत नाही? नातं सहज तुटतं? अंकशास्त्रात म्हटलंय..
Numerology: विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम असणे खूप महत्वाचे आहे. आणि त्याहूनही अधिक दोघांमध्ये मैत्री असणं अत्यंत गरजेचं आहे. अंकशास्त्रात म्हटलंय..

Numerology: आयुष्यात खरा मित्र भेटणे एक ही भाग्याची गोष्ट आहे. तो जर भेटला तर आयु्ष्याचं सोनं होतं.. खरी मैत्री ही रक्ताची नाती नसली तरी कधीकधी ती त्यापेक्षाही चांगली ठरते. त्याचप्रमाणे प्रेम ही देखील एक सुंदर भावना आहे, जी मैत्रीपासून सुरू होते. जर दोन लोकांमध्ये मैत्री नसेल तर त्यांच्यात प्रेमाची शक्यता खूप कमी असते. म्हणूनच, विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम असणे खूप महत्वाचे आहे. अंकशास्त्राच्या मदतीने, एखाद्या व्यक्तीला त्याची मैत्री कोणत्या व्यक्तीसोबत दीर्घकाळ टिकेल, कोणाशी लग्न केले पाहिजे याचा अंदाज येतो. अंकशास्त्रात, प्रत्येक जन्मतारखेचे मित्र आणि शत्रू क्रमांक सांगितले आहेत, ज्यांचा लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो.
'या' जन्मतारखेच्या लोकांची मैत्री सहजासहजी तुटत नाही...
अंकशास्त्रात, जर तुमचा जन्म महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला झाला असेल, तर यांचा मूलांक 4 असतो, तर कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. मूलांक 4 आणि 7 असलेल्या लोकांची मैत्री खूप काळ टिकते, जी कोणीही सहजपणे तोडू शकत नाही. अंकशास्त्रानुसार सांगणार आहोत की, जर मूलांक 4 असलेल्या लोकांनी मूलांक 7 असलेल्या लोकांशी लग्न केले तर ती यशस्वी होण्याची शक्यता किती आहे. अंकशास्त्राच्या मदतीने जाणून घ्या, कोणत्या जन्मतारखेचा कोणता जोडीदार त्यांच्यासाठी सर्वोत्तम जीवनसाथी ठरेल. अंकशास्त्रानुसार, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मूलांक 4 आणि 7 असलेल्या लोकांचे नाते कसे असते? त्यांचे वैवाहिक जीवन कसे असते.
कोणीही त्यांना सहज फसवू शकत नाही...
अंकशास्त्रानुसार, राहू हा मूलांक 4 चा स्वामी आहे, तर केतू हा मूलांक 7 चा स्वामी मानला जातो. मूलांक 4 असलेल्या लोकांना खूप लवकर राग येतो. हे लोक सरळमार्गी असतात आणि त्यांच्या मनात काहीही ठेवत नाहीत. या लोकांचे मनही तीक्ष्ण असते, ज्याच्या मदतीने ते कठीण काळात सहज मात करतात. त्याच वेळी, मूलांक 7 असलेल्या लोकांचा स्वभाव खूप शांत असतो. या लोकांना धर्मात रस असतो आणि अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांना मानसिक शांती मिळते. याशिवाय, या लोकांचा सर्वात चांगला गुण म्हणजे त्यांना अगदी लहान वयातच लोकांना कसे ओळखायचे हे माहित असते. या गुणामुळे, आयुष्यात कोणीही त्यांना सहज फसवू शकत नाही.
'या' जन्मतारखेच्या लोकांनी लग्न करावे की नाही?
अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोललो तर 4 क्रमांकाच्या लोकांनी 7 क्रमांकाशी लग्न करणे उत्तम ठरेल. जर एका जोडीदाराने चूक केली तर दुसरा त्याची काळजी घेतो. हे लोक एकमेकांसाठी सर्वोत्तम भागीदार असल्याचे सिद्ध होतात आणि यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात नेहमीच आनंद राहतो. याशिवाय, या लोकांची मैत्री देखील बराच काळ टिकते.
हेही वाचा :




















