एक्स्प्लोर

Navratri 2024: नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती

Navratri 2024 Adani Electricity : वीज स्वस्त केल्यानंतर अदानीने फक्त एक आवाहन केलं आहे. केवळ अधिकृत परवानाधारक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडूनच वायरिंग करून घ्यावं आणि चोरीची वीज वापरू नये, असं ते म्हणाले.

Navratri 2024 Adani Electricity : गणेशोत्सवाचा जल्लोष संपल्यानंतर आता नवरात्रीची धामधूम सुरू होणार आहे. या काळात मंडळांकडून प्रचंड प्रमाणात विजेचा वापर होतो. अशात मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटीने मंडळांना कमी दरात वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचं आवाहन  कंपनीने मंडळांना केलं आहे. वीज जोडणी घेण्याची प्रक्रिया कंपनीने सोपी केली आहे. वीज जोडणीसाठी अर्ज नेमका कसा करावा? जाणून घेऊया.

48 तासांतच मिळणार वीज जोडणी

नवरात्री आणि दुर्गापूजा उत्सव आयोजित करणाऱ्या मंडळांसाठी तात्पुरती वीज जोडणी घेण्याची प्रक्रिया कंपनीने सोपी केली आहे. अर्ज केल्याच्या 48 तासांतच आयोजकांना वीज जोडणी मिळू शकेल. त्यासाठी त्यांना अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या https://www.adanielectricity.com या वेबसाईटवर जाऊन न्यू कनेक्शनवर (New Connection) जाऊन तात्पुरती वीज जोडणी घ्यावी लागणार आहे.

गेल्या वर्षी 643 मंडळांना दिली वीज जोडणी

लवकरच येणाऱ्या नवरात्री-दुर्गापूजा उत्सवासाठी मुंबापुरी सज्ज होत आहे. उत्सवाचा आनंद वाढवण्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटी प्रयत्नात आहे. गेल्या वर्षी मुंबईत अदाणी इलेक्ट्रिसिटीने 643 नवरात्री-दुर्गापूजा मंडळांना वीज जोडणी देऊन अखंड वीजपुरवठा केला होता. मंडळांनी अर्ज केल्यानंतर 48 तासांत त्यांना वीजपुरवठा मिळावा, यासाठीही आमची पथकं प्रयत्नशील असल्याचं अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितलं.

परवानाधारक वीज कंत्राटदारांकडूनच करुन घ्या वायरिंग

मंडपात येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षिततेसाठी नवरात्री-दुर्गापूजा मंडळांनी अधिकृत परवानाधारक वीज कंत्राटदारांकडूनच आपल्या मंडपाचं वायरिंग करून घ्यावं. तसेच मंडळांनी अनिवार्य असलेले रेसिडेन्शियल करंट सर्किट ब्रेकर (आरसीसीबी) मंडपात लावून घ्यावे. त्यायोगे भाविकांची आणि कार्यकर्त्यांची सुरक्षा राखली जाईल, असंही आवाहन अदाणी इलेक्ट्रिसिटीने केलं आहे.

नवरात्री दुर्गापूजा मंडपात हे करावं आणि हे करू नये

हे करावे

  • मंडपात वायरिंग सुसज्ज असावे, मीटर केबिन मध्ये फक्त अधिकृत व्यक्तींना प्रवेश द्यावा.
  • वीज जोडण्यासाठी मान्यताप्रत वायर आणि स्विच वापरावेत.
  • आपातकालात वीजपुरवठा खंडित करण्यासाठी एक पॉईंट असावा.
  • वायरिंगना लावण्यासाठीच्या टेप ह्यादेखील मान्यताप्राप्त चिकटपट्ट्या असाव्यात.
  • मीटर केबिन आणि कनेक्शनच्या परिसरात जाण्यासाठी व्यवस्थित वाट ठेवावी.
  • मंजूर केलेल्या वीज क्षमतेएवढाच वीजभार मंडपात वापरण्यात यावा.
  • सुयोग्य क्षमतेच्या वायर तसेच मंजूर क्षमतेनुसार आरसीसीबी चा वापर करावा.बॅकअप साठी जनरेटर असल्यास जनरेटरचा पृष्ठभाग तसेच न्यूट्रल यांचे व्यवस्थित अर्थिंग व्हावे.
  • एक्सटेंशन साठी थ्री पिन प्लग वापरावा.
  • आग विझवणारे अग्निशामन उपकरण मीटर केबिन जवळ ठेवावे आणि ते वापरण्याची माहितीही कार्यकर्त्यांना द्यावी.
  • मीटर केबिन जवळ धोक्याचे चित्र-चिन्ह दाखवणारा फलक लावावा.
  • मीटर केबिनला व्यवस्थित अर्थिंग असावे.

हे करू नये

  • अवैध एक्सटेंशन घेऊ नये तसेच अवैध थेट वीजपुरवठा घेऊ नये.
  • वायरिंगना चुकीच्या पद्धतीने जोड देणे टाळावे.
  • मीटर केबिनच्या प्रवेशद्वारात कोणतेही अडथळे नसावेत.
  • मंजूर वीज भारापेक्षा जास्त वीजभार वापरू नये.
  • मोठे दिवे, फ्लड लाईट, मोठे पंखे तसेच वायरिंगच्या जोडण्या यांना कोणाचाही स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • मीटर केबिनमध्ये आणि मीटर केबिनच्या जवळ अवैध धोकादायक वस्तू ठेवू नयेत.

हेही वाचा :

Indian Railway : गुड न्यूज, सणांच्या काळात सर्वांना रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणार, भारतीय रेल्वे 519 विशेष ट्रेन चालवणार...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget