एक्स्प्लोर

Navratri 2022 : देवीच्या तिसऱ्या अर्थात चंद्रघंटा रूपाची जाणून घ्या आख्यायिका 

Navratri 2022 : दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते.

Navratri 2022 : अश्विन नवरात्रात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री रूपाची आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते. तर तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा (Chandraghanta) या रूपाची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने संकट निवारण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. जाणून घेऊया चंद्रघंटा देवीची आख्यायिका. 

दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे तीला 'चंद्रघंटा देवी' असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तीचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते.

माता चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. माता भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तीचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तीच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या रूपात देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होवून संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते.

आवाजात मधुरता येते. मता चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात. आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा. तीची उपासना केल्यामुळे सर्व संसारीक संकटातुन मुक्ती मिळते. आपण नेहमी तीची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे. इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तीचे लक्ष आहे.

चंद्रघंटा देवीचा मंत्र

पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:।।

महत्वाच्या बातम्या

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका 'या' पाच गोष्टी  

Navratri 2022 : नवरात्रीत 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?

व्हिडीओ

Eknath Shinde PC : ठाकरे बंधूंची युती, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, 'पांडुरंग कुठे? विठ्ठल तर आमच्याकडे'
Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Embed widget