Monthly Horoscope December 2025 : वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना 4 राशींचं भाग्य घेऊन येणार; कुंभसह 'या' राशींचं बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, राजासारखं आयुष्य जगाल
Monthly Horoscope December 2025 : डिसेंबर महिन्यात ग्रहांच्या संक्रमणाने चार राशींना विशेष लाभ मिळणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य, शुक्र आणि मंगळ ग्रह वृश्चिक राशीत स्थित असणार आहेत.

Monthly Horoscope December 2025 : चालू वर्ष 2025 वर्षाचा शेवटचा डिसेंबरचा (December) महिना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबर महिन्यात ग्रहांच्या होणाऱ्या संक्रमणाने चार राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य, शुक्र आणि मंगळ ग्रह वृश्चिक राशीत स्थित असणार आहेत. बुध ग्रह तूळ राशीत, गुरु कर्क आणि शनी मीन राशीत विराजमान असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची ही स्थिती चार राशींसाठी लाभदायी ठरेल. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Horoscope)
डिसेंबरचा महिना तूळ राशीसाठी प्रगतीचे संकेत देणारा असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगला आणि मोठं परिवर्तन घडणार आहे. तसेच, या काळात तुम्हाला प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. खर्चावर मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वर्षाचा शेवटचा महिना तुमच्यासाठी फार भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुम्ही मानसिकदृष्ट्या देखील सक्षम असाल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र हा प्रवास सुखकर असेल. तसेच, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ फारच अनुकूल असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. तसेच, ग्रहांच्या सकारात्मक परिणामांमुळे तुम्हाला भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. तुमच्यात लीडरशिप क्वालिटी दिसून येईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी डिसेंबरचा महिना फारच अनुकूल असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. खर्च कमी करा. नवीन प्रोजेक्ट तुमच्या हाती लागू शकतं. तसेच, व्यवसायात पुढे जाण्यासाठी अनेक शुभ संकेत मिळतील. तुमच्या आयुष्यात सकारात्मकता टिकून राहील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















