(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Monthly Horoscope August 2023 : ऑगस्ट महिना 'या' राशींच्या लोकांसाठी खास, तर काही राशींसाठी आव्हानात्मक; मासिक राशीभविष्य
Monthly Horoscope August 2023 : ऑगस्ट महिना अनेकांना यशाकडे घेऊन जाणारा ठरेल. तर, काही राशींसाठी आव्हानात्मक असेल.
Monthly Horoscope August 2023 : ऑगस्ट महिना अवघ्या दोन दिवसांवर आहे. हा महिना अनेकांसाठी भाग्याचा ठरणार आहे. तर, काही राशींसाठी खूप आव्हानात्मक असणार आहे. एकूणच ऑगस्ट महिना प्रत्येक 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे? जाणून घेऊयात ऑगस्ट महिन्याचं राशीभविष्य.
मेष
ऑगस्ट महिन्यात तुम्हाला पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. या महिन्यात, योग्य आर्थिक व्यवस्थापन करावे लागेल, अन्यथा तुमचा खर्च वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी देऊ शकाल. नोकरीत नवीन ऑफर येऊ शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांचे अपत्याशी संबंधित समस्येमुळे मन थोडे चिंतेत राहू शकते. खर्चही वाढतील. दुसऱ्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी कामाचा ताण राहील. यामुळे काळजी वाटेल. व्यवसायात पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. महिन्याच्या शेवटी व्यवसायात फायदा होईल. अपेक्षित लाभ मिळण्याची संधी मिळेल. प्रेमप्रकरणाच्या दृष्टिकोनातून वेळ खूप शुभ आहे. परीक्षा स्पर्धेच्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल.
मिथुन
ऑगस्ट महिन्यात मिथुन राशीच्या लोकांचा करिअर-व्यवसायाला नशिबाची साथ मिळेल. एखादे अडकलेले काम मित्र-मैत्रिणीच्या मदतीने पूर्ण होईल. परीक्षा-स्पर्धेत चांगली बातमी मिळेल. वाहन किंवा घराच्या सुखसोयीमध्ये वाढ होईल. दुसऱ्या आठवड्यात अचानक मोठी रक्कम मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात यश मिळेल.
कर्क
ऑगस्ट महिन्यात कर्क राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत चढ-उतार होतील. खर्चही वाढतील. महिन्याच्या अखेरीस आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील चर्चा यशस्वी होईल. कौटुंबिक तणाव असू शकतो. या महिन्यात तुम्ही तुमच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. अनावश्यक प्रवास टाळा. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग आणि ध्यान करणं फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाणार आहे. आवडत्या विषयावर अभ्यास करण्याची संधी मिळेल तसेच नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील.
सिंह
ऑगस्ट हा महिना सिंह राशीसाठी चढ-उतारांनी भरलेला असेल. करिअरच्या दृष्टीने वेळ सरासरी राहील. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराबरोबर वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्याचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होईल. याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होईल. या महिन्यात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होईल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात करिअरमध्ये यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कामगिरी चांगली राहील. आरोग्याशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. या महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. एखादा दिर्घकालीन आजार असेल तर त्याकडे हलगर्जीपणा करू नका. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अनुकूल आहे. परदेशात जाण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तूळ
ऑगस्ट 2023 हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी काही खास असणार नाही. बेरोजगार लोक नोकरीच्या शोधात असतील. कामाचा ताण वाढेल. व्यवसायात परिस्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबतचे संबंध खराब होऊ शकतात. या महिन्यात तुमच्या जोडीदाराची तुम्हाला नव्याने ओळख होईल. तुमच्या त्यांच्यावरचा विश्वास आणि प्रेम आणखी वाढेल.
वृश्चिक
या महिन्यात नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. व्यवसायात फायदा होईल. या काळात नफा आणि खर्च या दोन्हींचा सामना करावा लागू शकतो. खर्च वाढू शकतो. आरोग्य चांगले राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. या महिन्यात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो.
धनु
या महिन्यात पदोन्नतीची शक्यता आहे. नोकरीत नवीन संधी मिळतील. आरोग्य चांगले राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन आनंददायी राहील. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल आहे. जुलैमध्ये फुफ्फुसाचे किंवा श्वसनाचे आजार होऊ शकतात, काळजी घ्या.
मकर
करिअरच्या दृष्टीने हा महिना अस्थिर असेल. कामाचा ताण राहील. आर्थिक लाभासोबतच खर्चही वाढतील. प्रवासात सावध राहण्याची गरज आहे. तब्येत ठीक राहील. प्रेमप्रकरण आणि कौटुंबिक जीवनात चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. स्पर्धेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी चांगला आणि पुढे जाणारा असेल. तुमची आरोग्यविषयक जागरुकता तुमचा मानसिक ताण दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
कुंभ
करिअरच्या दृष्टीने हा महिना आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण राहील. व्यवसायातही मार्ग अवघड असू शकतो. आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन अडचणीचे असेल. या महिन्यात तुम्हाला कर्ज घेण्याचीही संधी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुम्ही आजारी पडू शकता.
मीन
मीन राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात करिअरमध्ये आव्हानांना सामोरे जावे लागेल. व्यवसायात कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. खर्च वाढल्यामुळे पैसे वाचवण्यात अडचण येईल. तब्येतीची समस्या राहील. कौटुंबिक जीवनात मतभेद होऊ शकतात. या महिन्यात कौटुंबिक शांतीसाठई तुम्हाला मौल्यवान क्षण काढावे लागतील. वैवाहिक जीवनात संतुलन राहील. फक्त अहंकार बाजूला ठेवा. तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकते, तुम्ही जागरूक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :