एक्स्प्लोर

Horoscope Today 30 July 2023 : मेष, कर्कसह 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभाची संधी मिळणार; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 30 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 30 July 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कष्टाचा असेल. तर, मिथुन राशीला कामात यश मिळेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा रविवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमचे तुमच्या पालकांशी वैचारिक मतभेद असू शकतात. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर त्यासाठी आजचा दिवस काहीसा योग्य नाही. तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकते. तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मुलांकडूनही तुमचे मन प्रसन्न राहील. तुमचे परस्पर संबंध सुधारतील. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही कुटुंबियांसाठी काही वस्तूंची खरेदी करू शकता. वैवाहिक जीवनात सुख शांती राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आज प्रवास करताना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे काळजी घ्या.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर आपण छोट्या व्यावसायिकांबद्दल बोललो तर त्यांना त्यांच्या व्यवसायात चांगला नफा देखील मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. नोकरदारांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. वरिष्ठही तुमच्या कामाचे कौतुक करतील. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणाऱ्या लोकांसाठी चांगली डील फायनल होईल. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुमची एखादी मोठी व्यावसायिक योजना फलदायी ठरेल. नोकरीतही प्रगतीच्या संधी मिळू शकतात. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकार्‍यांकडून तुमच्यावर काही कामही सोपवले जातील. ही जबाबदारी तुम्ही चोख पार पाडाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. जे लोक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना अधिक मेहनत करावी लागेल, तरच तुमच्या मेहनतीला यश येईल.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही खूप दिवसांपासून घर, प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला त्यात यश मिळेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण व्हा आणि अतिउत्साह टाळा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना अधिका-यांकडून काही संधी मिळतील, त्यामुळे तुमच्या नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबात मांगलिक कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व नातेवाईकांचे येणे-जाणे सुरू होईल. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज घरातील सदस्यांबरोबर पैसे कसे वाचवायचे हे शिकून घ्या जेणेकरून भविष्यात तुम्हाला फायदा होईल. आज कुटुंबातील एखाद्या सदस्याबरोबर एखाद्या गोष्टीवरून वादाची परिस्थिती उद्भवू शकते, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल आणि जास्त राग टाळावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांमुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील, ज्यामध्ये तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. मित्रांद्वारे तुम्ही नवीन लोकांच्या संपर्कात याल ज्यातून तुम्हाला नफा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुणाच्या तरी मदतीने तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवाल. कुटुंबातील सदस्यांबरोबर बसून आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करा. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा खूप चांगला आहे. विद्यार्थी ज्या परीक्षेसाठी तयार करत होते त्यामध्ये त्यांना यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज मुलाच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवू शकते. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा दिवस असेल. तुमचं वैवाहिक जीवन तुम्ही अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना करा, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील. जे घरापासून दूर शिकत आहेत, त्यांना कुटुंबाची आठवण येऊ शकते. आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. ज्यामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरीत यश मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. रखडलेला पैसा तुम्हाला परत मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक समस्या त्रासदायक असू शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आज तुम्हाला तुमचा जुना मित्र देखील भेटू शकतो. ज्याच्यासोबत तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतील. तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. विद्यार्थी स्पर्धेच्या तयारीसाठी मेहनत घेतील. परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठांचीही मदत घ्या. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. रिअल इस्टेट व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. जे घरबसल्या ऑनलाइन काम करतात, त्यांना चांगला फायदा होईल. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणार्‍यांना चांगली डील मिळू शकते ज्यातून त्यांना फायदा होईल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. स्वतःसाठी थोडी खरेदी करा. जोडीदाराकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरात मांगलिक कार्यक्रम आयोजित केले जातील. घरी पाहुण्यांची ये-जा असेल. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरीशी संबंधित कामे मोठ्या समर्पणाने आणि मेहनतीने करताना दिसाल. वरिष्ठ तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर यश आणि प्रतिष्ठा तुमचीच असेल. तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खर्च वाढतील पण आर्थिक स्थिती मजबूत राहील. ऑनलाईन काम करणाऱ्यांना चांगला फायदा होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणीच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांशी संवाद साधा.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही काही नवीन काम करण्याची योजना करत असाल तर त्यात तुम्हाला यश येईल ज्यामध्ये तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. जर कोणी तुमचे पैसे घेतले असतील तर तेही तुम्हाला आज परत मिळण्याची शक्यता आहे. आज घरात शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घर, प्लॉट खरेदी करण्याची इच्छा असेल तर हा योग चांगला आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 29 July 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! कसा आहे आजचा शनिवार? राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 31 July 2026: जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget