एक्स्प्लोर

Mercury Transit : पुढचे 3 दिवस 'या' 4 राशींसाठी वरदानाप्रमाणे; बुध करणार धनवर्षाव, नवीन नोकरीच्या संधीही येणार धावून

Mercury Transit 2024 : बुध ग्रह या वेळी मेष राशीत स्थित आहे, यानंतर 31 मे रोजी बुध वृषभ राशीत प्रवेश करेल. या दरम्यान 24 मेपर्यंत बुध अधिक सक्रिय असणार आहे, याचा काही राशींना प्रचंड लाभ होईल.

Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुद्धिमत्ता, वाणी आणि व्यवसायाचा दाता असलेला बुध ग्रह सध्या मेष राशीत आहे. 21 ते 24 मे दरम्यानच्या काळात बुध अत्यंत सक्रिय अवस्थेत असेल. याचाच अर्थ, या काळात बुध ग्रहाच्या आंशिक शक्तीचा प्रभाव जास्त असणार आहे. 31 मे रोजी बुध शुक्राच्या राशीत, म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करेल.

वृषभ राशीत प्रवेश करण्याआधी बुध काही राशींवर कृपा करेल. या लोकांना संपत्तीत लाभ मिळू शकतो आणि नवीन नोकरी मिळू शकते. काही महत्त्वाच्या कामात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला मान-सन्मान मिळेल. येत्या 3 दिवसांत कोणत्या राशींचं (Zodiac Signs) भाग्य उजळणार? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

बुधाच्या स्थितीमुळे वृषभ राशीच्या लोकांना खूप लाभ होईल. जे लोक व्यवसायात आहेत त्यांना खूप फायदा होईल. परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ यशाचा आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. तुम्हाला तुमच्या सध्याच्या नोकरीत बढती मिळेल. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळतील आणि तुमचे खर्चही कमी होतील. एकंदरीत हा काळ सर्वच दृष्टीने अत्यंत फलदायी आहे. 

मिथुन रास (Gemini)

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होईल. या काळात तुमचा व्यवसाय चांगला चालेल. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ लाभदायक ठरेल, जर त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर यशच यश आहे. या काळात तुमचा अडकलेला पैसा परत मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. 

कन्या रास (Virgo)

हे 3 दिवस तुमच्यासाठी फायद्याचे आहेत. तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात, ज्याची तुम्हाला अपेक्षाही नसेल. कामात यश मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. करिअरमध्ये आलेल्या अडचणी दूर होतील. वैवाहिक जीवनातही प्रेम वाढेल. प्रेमीयुगुलासाठी देखील हा चांगला वेळ असेल, लवकरच तुम्ही लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकतं. 

कुंभ रास (Aquarius)

या 3 दिवसांचा जास्तीत जास्त फायदा घ्या, या काळात तुमच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. वाणीवर नियंत्रण ठेवल्यास अधिक लाभ मिळतील. तुमचे निर्णय भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास चांगली बचत करण्यात यशस्वी व्हाल. विचारपूर्वक केलेली गुंतवणूक नफा मिळवून देईल. वैयक्तिक जीवनासाठीही वेळ शुभ आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Buddha Purnima 2024 : बौद्ध पौर्णिमेला 'या' 3 राशींवर राहणार शनीची विशेष कृपा; श्रीमंतीसह भौतिक सुखात होणार वाढ, पुढचा काळ आनंदीआनंदाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget