Masik Shivratri 2025: अविवाहित तरुणींनो.. मनासारखा नवरा हवाय? भोलेनाथ होतील प्रसन्न! मासिक शिवरात्रीला 'या' पद्धतीने व्रत करा
Masik Shivratri 2025: धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शंकर हे स्वभावाने अत्यंत भोळ्या स्वभावाचे आहेत. त्यांची पूजा-आराधना केल्याने ते लवकर खूश होऊन भक्तांना इच्छित वरदान देतात.
Masik Shivratri 2025: हिंदू धर्मात भगवान शिव यांना विश्वाचे संहारक म्हटले जाते. पार्वतीचा पती म्हणजेच भगवान शंकर यांना महादेव, भोलेनाथ, आदिनाथ इत्यादी नावं आहेत. ज्याप्रमाणे ब्रह्मदेव हे या विश्वाचे कर्ता आहेत आणि भगवान विष्णू पालनकर्ते आहेत, त्याचप्रमाणे शिव देखील विश्वाचे संहारक आहेत. तसेच ते स्वभावाने अत्यंत भोळ्या स्वभावाचे आहेत. त्यांची पूजा-आराधना केल्याने ते लवकर खूश होऊन भक्तांना इच्छित वरदान देतात. हिंदू धर्मात, मासिक शिवरात्रीचा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे. मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे व्रत आणि पूजा केली जाते. मासिक शिवरात्रीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मासिक शिवरात्रीचे व्रत पाळल्याने अविवाहित मुलींना इच्छित वर मिळतो, अशी धारणा आहे.
भगवान शंकर सर्व मनोकामना पूर्ण करतील..
हिंदू धर्मात चतुर्दशी तिथी अत्यंत शुभ आणि विशेष मानली जाते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी ही मासिक शिवरात्र असते. मासिक शिवरात्रीला भगवान शंकराचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे. मासिक शिवरात्रीचे व्रत करून भगवान शंकराची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते की अविवाहित मुलींनी मासिक शिवरात्रीचे व्रत केल्यास त्यांना इच्छित वर मिळतो. अशा परिस्थितीत मासिक शिवरात्रीला अविवाहित मुलींसाठी उपवास करण्याची पद्धत काय आहे? जाणून घेऊया.
मासिक शिवरात्री कधी आहे?
हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 27 जानेवारी रोजी रात्री 8.34 वाजता सुरू होईल. ही तारीख 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 7:35 वाजता संपेल. अशा स्थितीत 27 जानेवारीला मासिक शिवरात्री साजरी केली जाणार आहे. 27 जानेवारीला मासिक शिवरात्रीचे व्रतही पाळले जाणार आहे.
कुमारीका मुली व्रत ठेवू शकतात?
स्त्री आणि पुरुष दोघेही मासिक शिवरात्रीचे व्रत करू शकतात. तसेच अविवाहित मुलीही हे व्रत करू शकतात. महाशिवरात्रीच्या दिवसापासून मासिक शिवरात्रीचे व्रत सुरू करावे. मासिक शिवरात्रीच्या रात्री शक्य असल्यास जागरण करून शिवाची पूजा करावी.
मासिक शिवरात्री उपवास पद्धत
- मासिक शिवरात्रीच्या दिवशी अविवाहित मुलींनी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे.
- व्रताचा संकल्प करावा.
- शिवमंदिरात जाऊन भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा करावी.
- शिवलिंगाचा रुद्राभिषेक जल, शुद्ध तूप, दूध, साखर, मध, दही इत्यादींनी करावा.
- शिवलिंगावर बेलपत्र आणि फळे अर्पण करावीत.
- यानंतर धूप, दीप, फळे, फुले इत्यादींनी भगवान शंकराची पूजा करावी.
- शिवपुराण, शिव स्तुती, शिव अष्टक, शिव चालीसा आणि शिव श्लोक यांचे पठण पूजा करावे.
- फळे संध्याकाळी खावीत. शिवरात्रीच्या उपवासात अन्न सेवन करू नये.
- दुसऱ्या दिवशी शंकराची पूजा करून दान वगैरे करून व्रत मोडावे.
मासिक शिवरात्रीच्या व्रताचे महत्त्व
मासिक शिवरात्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे. मासिक शिवरात्रीचे व्रत हे शिव आणि पार्वतीच्या विवाहाचे प्रतीक मानले जाते. मासिक शिवरात्रीला भगवान शिव खूप प्रसन्न होतात. जो कोणी या दिवशी व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मासिक शिवरात्रीच्या व्रतामुळे अविवाहित मुलींना इच्छित वर मिळण्यास मदत होते. याशिवाय हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळेही दूर होतात.
हेही वाचा>>>
फक्त 66 दिवसांची प्रतिक्षा..मग 'या' राशींची चांदीच चांदी! शनिदेवांची कृपा, भाग्य चमकणार! ज्योतिषशास्त्रानुसार म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )