![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Durga Ashtami 2024 : आज दुर्गाष्टमी! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
Masik Durga Ashtami 2024 : मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवीची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, भक्तांचे सर्व कष्ट दूर होतात आणि आर्थिक स्थिती सुधारते. माघ महिन्यात आलेल्या दुर्गाष्टमीची तिथी आणि पूजा पद्धत जाणून घ्या
![Durga Ashtami 2024 : आज दुर्गाष्टमी! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व masik Durga Ashtami 2024 today in durgashtmai know rituals shubh muhurta and significance Durga Ashtami 2024 : आज दुर्गाष्टमी! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/17/ce2f6e161b4efe267a804032eaee0c551708141614390713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Durgashtami 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं एक विशेष महत्त्व आहे. देवी-देवतांना विशेष महत्त्व दिलं जातं, यात देवी दुर्गेला आदिशक्तीचा दर्जा आहे. वर्षातील प्रत्येक महिन्यात आदिशक्ती दुर्गा मातेचं विधान आहे. आदिशक्तीचे 9 मुख्य रुपं आहेत आणि या सर्व रुपांच्या पूजेसाठी दुर्गाष्टमीचा दिवस समर्पित आहे. त्यानुसार, माघ महिन्यातील अष्टमी (Ashtami) तिथी दुर्गाष्टमी (Durgashtami) तिथी म्हणून ओळखली जाते.
यंदा ही दुर्गाष्टमी आज, म्हणजेच 17 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. या दिवशी दुर्गा देवीची पूजा विधीपूर्वक केली जाते. देवीची विधीवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटं दूर होतात, अशी मान्यता आहे. त्यानुसार, मासिक दुर्गाष्टमीची तिथी, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घेऊया.
मासिक दुर्गाष्टमी तिथी (Durgashtami Tithi)
हिंदू पंचांगानुसार, 16 फेब्रुवारीला रात्री 8 वाजून 55 मिनिटांनी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी प्रारंभ झाली. यानंतर 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी ही अष्टमी तिथी संपेल.
उदय तिथीनुसार, आज 17 फेब्रुवारी रोजी मासिक दुर्गा अष्टमी व्रत पाळण्यात येणार आहे.
मासिक दुर्गाष्टमी पूजा विधी (Durgashtami Puja Vidhi)
मासिक दुर्गा अष्टमीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावं. यानंतर गंगाजल टाकून दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करावी. देवी दुर्गेला गंगाजलाने अभिषेक करावा. तसंच दुर्गा मातेसमोर दिवा लावावा. त्यानंतर तांदूळ, कुंकू आणि लाल फुलं अर्पण करावीत. मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करावी. तसेच धूप, दिवे आणि अगरबत्ती लावून दुर्गा चालिसा पठण करा. असं केल्याने माता दुर्गा लवकरच प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता आहे.
दुर्गाष्टमीचे महत्व (Durgashtami Significance)
दुर्गा अष्टमीच्या दिवशी दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते आणि या दिवशी कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. कन्यापूजेसाठी 2 ते 10 वयोगटातील मुलींना घरी बोलावलं जातं आणि त्यांनी जेवण दिलं जातं. अष्टमीच्या दिवशी मुलीची पूजा केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देते, असं म्हणतात. कारण मुलींना देवी दुर्गेचं रूप मानलं जातं. काही लोक दुर्गाष्टमीच्या दिवशी हवन देखील करतात आणि त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होतं, असं मानलं जातं. तसंच घरात काही नकारात्मकता असेल तर ती देखील संपते. हवन करताना नवग्रहांचीही पूजा केली जाते, असं केल्याने ग्रह दोष शांत होतात, अशी मान्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)