एक्स्प्लोर

Shani Dev : शनिदेवाची 'या' 3 राशींवर राहते सदैव कृपा; समस्या राहतात दूर, साडेसातीचाही होत नाही परिणाम

Shani Dev Favourite Zodiac Signs : शनिदेवाला काही राशी अतिशय प्रिय आहेत, या राशीच्या लोकांना शनि जास्त त्रास देत नाही. या राशींवर सदैव शनीची कृपा राहते. आता शनीला प्रिय असलेल्या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या

Shani Dev 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार,  शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. नवग्रहांमध्ये शनिदेवाचं स्थान अतिशय खास असल्याचं सांगितलं जातं. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जो व्यक्ती वाईट कर्म करतो त्याला शनि (Shani) कष्ट देतो, तर चांगले कर्म करणाऱ्यांना चांगलं फळ देतो. शनीच्या वक्रदृष्टीला सर्वच जण घाबरतात. शनि जेव्हा नाराज होतो, त्यावेळी व्यक्तीच्या जीवनात समस्या येण्यास सुरुवात होते.

शनीची सावली, शनीची वक्रदृष्टी, शनीची दशा, साडेसाती आणि शनीची धय्या यापासून केवळ मानवच नव्हे, तर देवही सुटू शकत नाहीत, हे शनि चालिसावरून देखील ओळखलं जातं. पौराणिक कथेनुसार, भगवान शिव देखील शनिदेवाच्या छायेपासून सुटू शकले नाहीत. परंतु, अशा काही राशी आहेत, ज्यांच्यावर शनीची सदैव कृपा असते.

ज्योतिष शास्त्रामध्ये तीन राशींबद्दल सांगण्यात आलं आहे, ज्यांच्यावर शनिदेव मेहरबान आहेत आणि त्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा आहे. या काही राशीच्या लोकांना शनि कधी जास्त त्रास देत नाही. इतर राशींच्या तुलनेत या तीन राशींवर शनीची अशुभ दृष्टी, साडेसाती, धय्या आणि शनिदोषाचा प्रभाव कमी असतो. आता या शनीच्या आवडत्या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

तूळ रास (Libra)

तूळ राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे आणि या राशीत शनि उच्च स्थानी आहे, या कारणास्तव तूळ राशीच्या लोकांवर नेहमी शनिदेवाची विशेष कृपा राहते. शनीची साडेसाती जरी त्यांच्यावर आली तरी त्याचा फारसा प्रभाव त्यांच्यावर पडत नाही. या राशीचे लोक धय्या आणि साडेसाती काळातही चांगली प्रगती करतात. शनीच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना मोठं पद आणि जबाबदाऱ्या मिळत राहतात.

मकर रास (Capricorn)

मकर राशीचे अधिपती स्वतः शनि महाराज आहेत, त्यामुळे मकर राशीच्या लोकांवरही शनिदेवाची विशेष कृपा राहते. मकर राशीचे लोक मेहनती, सक्रिय आणि प्रामाणिक असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांना शनिदेव आपला आशीर्वाद देतात. मकर ही शनिदेवाला प्रिय असलेली रास आहे. शनीच्या आशीर्वादाने मकर राशीच्या लोकांची प्रगती होते आणि त्यांना सुख-समृद्धी लाभते. शनीच्या शुभ प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांची स्वप्न पूर्ण होतात.

कुंभ रास (Aquarius)

मकर राशीप्रमाणेच कुंभ राशीचा शासक ग्रहही शनि आहे. कुंभ राशीचे लोक शांत स्वभावाचे असतात आणि त्यांचा कर्मावर जास्त विश्वास असतो. कुंभ राशीचे लोक चांगले कर्म करण्याला प्राधान्य देतात आणि म्हणूनच या राशीच्या लोकांवर शनीची वाईट नजरही पडत नाही. शनिदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या कामात लवकर यश मिळतं. कुंभ राशीवर शनिदेवाची विशेष कृपा राहते. कुंभ राशीच्या लोकांना कधी पैशाची कमतरता नसते, त्यांना पैसे कमावण्याच्या संधी मिळत राहतात. त्यांना समाजात चांगला मान-सन्मान मिळतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Guru Gochar 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू करणार वृषभ राशीत प्रवेश; 'या' राशींची अडकलेली कामं होणार पूर्ण, धनलाभाचेही योग

महत्त्वाच्या बातम्या

2027 Horoscope: नववर्षात मोठी संधी...पैसा..नोकरी..प्रेम! 2027 वर्ष कसं जाणार? कोणत्या राशी मालामाल? कोणाला टेन्शन? 12 राशींचे वार्षिक राशीभविष्य वाचा..
नववर्षात मोठी संधी...पैसा..नोकरी..प्रेम! 2027 वर्ष कसं जाणार? कोणत्या राशी मालामाल? कोणाला टेन्शन? 12 राशींचे वार्षिक राशीभविष्य वाचा..
Baba Vanga: बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत मोठा इशारा..31 डिसेंबरपर्यंत 4 राशींवर संकटाचं सावट? तर 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, तुमची रास?
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत मोठा इशारा..31 डिसेंबरपर्यंत 4 राशींवर संकटाचं सावट? तर 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, तुमची रास?
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! ग्रहांचे मागोमाग पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम, ज्योतिषशास्त्र..
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! ग्रहांचे मागोमाग पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम, ज्योतिषशास्त्र..
Horoscope Today : आज सोमवारच्या दिवशी 6 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 6 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Amit Shah : अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुण्यात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा,बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Embed widget