Mars Transit : येत्या 3 दिवसांत बदलणार 'या' 3 राशींचं नशीब; नवीन वर्षाआधीच जीवन होणार मंगलमय
Mars Transit Horoscope: वर्षाच्या शेवटी ग्रहांचा अधिपती मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचे भ्रमण अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात शुभफळ आणेल.
Mangal Gochar in Dhanu: वर्ष 2023 चा शेवट काही लोकांचं आयुष्य आनंदाने भरवणारा ठरेल. वर्षाचा शेवट काही लोकांसाठी खूप शुभ असू शकतो. मंगळाचं संक्रमण या लोकांसाठी खूप शुभ परिणाम देईल. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ हा धनु राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ 27 डिसेंबर 2023 रोजी रात्री 11:40 वाजता आपली राशी बदलेल आणि धनु राशीत प्रवेश करेल. त्याचा शुभ प्रभाव सर्व 12 राशींवर राहील. यापैकी काही राशीच्या लोकांना मोठे फायदे मिळू शकतात. कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) मंगळाचं मार्गक्रमण (Mars Transit) फायदेशीर ठरेल हे जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि हे मंगळ संक्रमण या लोकांना अनेक लाभ देईल. या लोकांना 28 डिसेंबरपासून व्यवसायात यश मिळेल. मेष राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. मेहनतीचे शुभ फळ मिळेल. तुमचा उत्साह आणि ऊर्जा वाढेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. येत्या काही दिवसांत कुठेतरी सहलीला जाता येईल. मंगळाचे भ्रमण तुमची बुद्धी आणि धैर्य वाढविण्यात मदत करेल.
तूळ रास (Libra)
मंगळाचा होत असलेला राशी बदल तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. या लोकांना प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळेल. त्यांचा वेळ चांगला जाईल. प्रेमसंबंधांत असलेल्या जोडप्यांचे विवाह निश्चित होऊ शकतात, ते एकत्र चांगला वेळ घालवतील. वर्षा अखेरीस तुम्हाला सहलीला जाता येईल. उपासनेची आवड निर्माण होईल. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो. मालमत्तेतून लाभ होऊ शकतो. मंगळाच्या या भ्रमणामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि चांगले आरोग्य लाभेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांना मंगळ खूप शुभ फळ देतो. या राशीचा स्वामी देखील मंगळ आहे. मंगळाच्या भ्रमणामुळे या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. जर तुम्ही सुरक्षितपणे गुंतवणूक केली तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थितीही मजबूत राहील. काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. या काळात आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: