Rahu Transit : नवीन वर्षात मायावी ग्रह राहू करणार मीन राशीत भ्रमण; 'या' 3 राशींच्या संपत्तीत होणार वाढ, मिळणार अपार लाभ
Rahu Transit in Pisces : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहू ग्रह 2024 मध्ये मीन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं.
Rahu Transit in Pisces : वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला मायावी ग्रह मानले जाते आणि राहू सुमारे 15 महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गक्रमण करतो. 2024 मध्ये राहू ग्रह संपूर्ण वर्ष मीन राशीत भ्रमण करेल, त्यामुळे सर्व 12 राशींवर त्याचा प्रभाव दिसून येईल. परंतु अशा 3 राशी आहेत, ज्यांना 2024 मध्ये अचानक आर्थिक लाभ मिळण्याची आणि त्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे. या भाग्यशाली राशींबद्दल (Zodiac Signs) जाणून घेऊया.
कुंभ रास (Aquarius)
मीन राशीतील राहूचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते . कारण राहू ग्रह तुमच्या राशीचा स्वामी शनिदेवाचा मित्र आहे. तसेच राहू ग्रह तुमच्या राशीतून धन गृहात प्रवेश करत आहे आणि वर्षभर तो तिथेच राहील. म्हणून, नवीन वर्षात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळत राहतील. तसेच तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले ठरणार आहे, म्हणजे अशा लोकांना सरकारी नोकऱ्या मिळू शकतात. तसेच, 2024 मध्ये तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल.
तुळ रास (Libra)
मीन राशीतील राहू ग्रहाचे भ्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण राहू ग्रह तुमच्या राशीतून सहाव्या भावात भ्रमण करेल. त्यामुळे यावेळी तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल. शत्रूंवरही तुमचा विजय होईल. दुसरीकडे, जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला 2024 मध्ये चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. तसेच यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. नवीन वर्षात तुम्ही नवीन काम सुरू करू शकता, जे तुमच्यासाठी शुभ राहील.
वृषभ रास (Taurus)
मीन राशीतील राहूचे भ्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण राहू ग्रह तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी प्रवेश करेल. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. नवीन स्त्रोतांकडून पैसे मिळवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना यश मिळू शकते. गुंतवणुकीतून फायदाही होऊ शकतो. या काळात तुम्ही शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये पैसे कमवण्यातही यशस्वी व्हाल. गुंतवणूक करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Shingnapur: काय आहे शनि शिंगणापूर मंदिराचा इतिहास? नेमका कोणत्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू?