Mars Transit 2025: हुश्श..अखेर आज मंगळ-केतूची अशुभ युती तुटली! 'या' 4 राशींसाठी अनर्थ टळला, श्रावण सोमवारीच भोलेनाथांचा चमत्कार
Mars Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 28 जुलै रोजी मंगळ संक्रमणामुळे मंगळ-केतूची अशुभ युती तुटली आहे. 'या' 4 राशींना मोठा फायदा होणार आहे.

Mars Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 28 जुलैचा दिवस अगदी खास आहे. कारण आज झालेल्या मंगळ संक्रमणामुळे मंगळ-केतूची अशुभ युती तुटली आहे. एकीकडे आज श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार देखील आहे. त्यामुळे भगवान भोलेनाथांचाच हा चमत्कार म्हणावा लागेल, कारण गेल्या दीड महिन्यांपासून मंगळ केतूसह सिंह राशीत होता. देश आणि जगासह अनेक लोकांना मंगळ-केतूच्या अशुभ युतीचे दुष्परिणाम सहन करावे लागले होतो. अखेर 28 जुलै रोजी मंगळ संक्रमणामुळे केतूसोबतची ही युती तुटली आहे. ज्यामुळे काही राशींना याचा फायदा मिळू शकतो.
अखेर मंगळ-केतूची अशुभ युती तुटली...
ज्योतिषशास्त्रानुसार, अखेर आज 28 जुलै रोजी मंगळ संक्रमणाचा हा युती तुटली आहे. ज्यामुळे 4 राशींना भरपूर लाभ मिळू शकतात. त्यांना करिअरमध्ये प्रगती आणि पैसा मिळू शकतो. मंगळाने कन्या राशीत भ्रमण केले आहे. यापूर्वी मंगळ सध्या सिंह राशीत होता आणि केतूशी युती करत होता. मात्र मंगळ संक्रमणामुळे मंगळ-केतूची अशुभ युती तुटली आहे. ज्यामुळे ४ राशींच्या जीवनातील अनर्थ टळला आहे.
कोणत्या राशींसाठी मंगळ संक्रमण सकारात्मक राहणार आहे?
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचे हे संक्रमण या लोकांना करिअरमध्ये मोठा फायदा देऊ शकते. तुमचा आत्मविश्वास उच्च असेल, ज्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या आईकडून पैसे मिळू शकतात. तुम्हाला जुन्या आजारापासून आराम मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये फायदा देऊ शकते. व्यावसायिकांचे प्रलंबित व्यवहार आता अंतिम होऊ शकतात. तुम्हाला पैसे मिळतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. आरोग्य सुधारेल. तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला यावेळी आनंद होईल.
वृश्चिक
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ देखील आहे. मंगळाचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांना संपत्ती तसेच उच्च पद देऊ शकते. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. कमी खर्चामुळे तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल. बँक बॅलन्स वाढेल.
धनु
हे मंगळ संक्रमण धनु राशीच्या लोकांना अनेक जुन्या समस्यांपासून मुक्ती देईल. तुम्ही अचानक हरवलेला खेळ जिंकू शकता. तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. घरातही आनंदाचे वातावरण असेल. धनु राशीच्या लोकांवर सध्या शनीच्या ढैय्याचा प्रभाव आहे, या वेळी ढैय्याच्या अशुभ प्रभावापासूनही आराम मिळेल.
हेही वाचा :
August 2025 Astrology: ऑगस्टमध्ये 'या' 6 राशींच्या नोकरीचं टेन्शन संपेल! प्रमोशन, पगारात घसघशीत वाढ, तुमची रास कोणती? ज्योतिषी म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















