Mangal Gochar 2025 : तब्बल दीड वर्षानंतर मंगळ झाला वक्री; 3 राशींच्या नशिबाला चार चाँद, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ मिथुन राशीत उलट चाल चालत आहे, ज्यामुळे काही राशींना सोन्याचे दिवस येतील. या राशींच्या सर्व इच्छा-आकांक्षा या काळात पूर्ण होतील.
Mangal Vakri 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह कधी-कधी सरळ चाल चालतार, तर ते कधी उलट चालतात. ग्रहांच्या स्थितीचा थेट परिणाम देश, जगासह सर्व राशीच्या लोकांवर होतो. यातच मंगळ सध्या उलट चाल चालत आहे. 21 जानेवारीपासून मंगळ मिथुन राशीत वक्री स्थितीत आहे. एप्रिल 2025 पर्यंत मंगळ या स्थितीत असेल. अशात मंगळाची उलटी चाल काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer)
मंगळाची उलटी चाल तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य वाढेल. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायात भरपूर नफा होईल आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच या काळात तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकता. या काळात विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन छान असेल. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाची उलटी चाल अनुकूल ठरू शकते. मंगळ तुमच्या राशीत उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी वक्री होईल. त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. तसेच, करिअर आणि संपत्ती विस्ताराचे मार्ग खुले होतील. नवीन योजनांमध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होईल. प्रॉपर्टीच्या व्यवहारातून मोठा फायदा होऊ शकतो. या काळात तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल.
कुंभ रास (Aquarius)
मंगळाची वक्री स्थिती तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. नोकरी-व्यवसायासाठी हा काळ चांगला असेल. या काळात तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकतं. तसेच या काळात तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आध्यात्मिक होऊ शकता. धार्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होईल. नोकरदार लोकांना या काळात चांगलं उत्पन्न मिळू शकतं. या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य वाढेल. तसेच तुमच्या उत्पन्नातही प्रचंड वाढू शकते. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल, तुमचे कौटुंबिक संबंध चांगले राहतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Rajyog : 24 जानेवारीपासून पालटणार 3 राशींचं नशीब, जगणार राजासारखं जीवन, नवपंचम राजयोग करणार कमाल