Rajyog : 24 जानेवारीपासून पालटणार 3 राशींचं नशीब, जगणार राजासारखं जीवन, नवपंचम राजयोग करणार कमाल
Navpancham Rajyog 2025: बुध आणि युरेनस 24 जानेवारीला एकमेकांपासून 120 अंशांत येतील, त्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल. यामुळे 3 राशींना चांगलाच लाभ होणार आहे. या राशींच्या सुख-संपत्तीतही अपार वाढ होईल.
Navpancham Rajyog 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो, ज्याचा सर्व 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो. बुद्धिमत्ता, नोकरी-व्यवसायाशी संबंधित बुध ग्रह देखील महिन्यातून दोनदा आपली रास बदलतो. ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होतो. यातच आता बुध युरेनससोबत मिळून नवपंचम राजयोग तयार करणार आहे.
पंचांगानुसार, 24 जानेवारीला पहाटे 3:35 वाजता बुध आणि युरेनस एकमेकांपासून 120 अंशांवर आले, ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार झाला आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून 120 अंशावर किंवा पाचव्या आणि नवव्या स्थानावर असतात, तेव्हा नवपंचम योग तयार होतो. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगामुळे 24 जानेवारीपासून 3 राशींना सोन्याचे दिवस येणार आहेत. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप फायद्याचा ठरू शकतो. या राशीच्या लोकांची प्रदीर्घ प्रलंबित कामं या काळात पूर्ण होऊ शकतात. यासोबतच नशीब पूर्णपणे तुमच्या पाठीशी असेल, तुमच्या आयुष्यात आनंदाचा बहर येईल. मुलांचं यश पाहून पालकांना अभिमान वाटेल. तुमच्या संवाद कौशल्यात वाढ होणार आहे. तुम्हाला वडील, आई, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचं पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुम्ही तुमची ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. अध्यात्माकडे तुमचा कल असेल, या काळात तुम्ही धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता.
कर्क रास (Cancer)
या राशीच्या लोकांसाठी बुध-युरेनस यांनी तयार केलेला नवपंचम राजयोग खूप खास असणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायात तुम्हाला भरपूर फायदा होईल. यासोबतच तुम्हाला परदेशी कंपनीकडून चांगला नफा मिळू शकतो. जोडीदारासोबत परदेश प्रवास होऊ शकतो. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील. यासोबतच तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल, तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कराल.
कन्या रास (Virgo)
या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप शुभ ठरेल. या राशीच्या लोकांची बौद्धिक क्षमता वाढणार आहे. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेली मेहनत आता यशस्वी होऊ शकते. तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. करिअर सुरू करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. तुमची लव्ह लाईफ सुद्धा चांगली असणार आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: