Makar Sankranti 2025: मकर संक्रातीला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे की नाही? सोन्याचे दागिनेही वर्ज्य? हिंदू धर्मानुसार काय म्हटलंय?
Makar Sankranti 2025: सणवार असले की महिलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. मात्र यंदा मकर संक्रांतीला खरंच पिवळा रंग वर्ज्य आहे का? नेमकं काय सत्य आहे? जाणून घ्या..
Makar Sankranti 2025: आज 2025 नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रात... या निमित्त देशभरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. कारण वर्षातील पहिला सण हा खास आहे. आणि सण म्हटला की विशेषत: महिला वर्गात याबाबत प्रचंड उत्सुकता दिसून येते. सणवार असले की महिलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. कारण हे नटण्याचे दिवस असतात. मग त्यात साडी कोणती नेसायची? कोणत्या रंगाची नेसायची? त्यावर दागिने कोणते? अगदी पायापासून ते डोक्यापर्यंत काय घालायचं? याबाबत महिलांमध्ये चर्चा असते. मात्र यंदा सोशल मीडियावर किंवा अनेकांच्या तोंडी हेच ऐकायला मिळत आहे की, यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे? हिंदू धर्मानुसार काय म्हटलंय? नेमकं सत्य काय? जाणून घ्या..
नवीन सुरुवातीचे प्रतीक
मकर संक्रांती हा एक महत्त्वाचा सण आहे, ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि त्याला नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. मकर संक्रांतीचा सण शुभ आणि समृद्धीशी निगडित आहे, परंतु या दिवशी काही गोष्टी वर्ज्य मानल्या जातात, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडतो असे म्हटले जाते.
View this post on Instagram
मकर संक्रांती सणाबद्दल काही नियम जाणून घ्या..
हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती सणाबद्दल काही नियम सांगण्यात आलेत. धार्मिक मान्यतेनुसार यंदा 14 जानेवारी 2025 ला सूर्य सकाळी 8.55 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे यंदा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी, कुठल्या रंगाच्या गोष्टी वर्ज्य आहेत हे सांगायचं झालं तर याचं कारण म्हणजे या दिवशी देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करुन वाघावर स्वार होऊ येणार आहे. तर तिचं उपवाहन घोडा आहे. शिवाय कपाळावर केशरी टिळा असणार आहे. त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाच्या साडीसह पिवळ्या बांगड्या, पिवळ्या रंगाच्या वस्तू, त्यासोबत केशरी टिळा, जाईचा फुलांचा गजरा आणि पिवळ्या रंगाची फुले या गोष्टी वर्ज्य असणार आहेत.
यंदा सोन्याचे दागिनेही नाही घालायचे की नाही?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक पोस्टमुळे यंदाच्या मकर संक्रांतीला पिवळा रंग परिधान करायचा की नाही याबाबत आता महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहेत. अनेक महिलांकडून प्रश्न विचारण्यात येतायत की, जर यंदा मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे. तर सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची का? तर धार्मिक मान्यतेनुसार यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालून येणार आहे. त्यामुळे पिवळा रंगाचे काही वापरायचं नाही. पण तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकतात. कारण यंदा मोत्याचे दागिनी घालायचे नाही आहे. याचं कारण म्हणजे देवी मोत्याचे दागिनी घालून येणार आहे. तर देवीने केशरी टिळा लावला आहे. त्यामुळे हळदीशी त्याचा काही संबंध नाही. त्यामुळे महिलांना हळदी कुंकू समारंभ बिनधास्त करता येणार आहे.
हेही वाचा>>>
Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीचा 'हा' शुभ मुहूर्त खास! धन-वैभव, सूर्यदेवाची कृपा लाभेल, पूजा-पद्धत जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )