Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीचा 'हा' शुभ मुहूर्त खास! धन-वैभव, सूर्यदेवाची कृपा लाभेल, पूजा-पद्धत जाणून घ्या..
Makar Sankranti 2025: धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला या शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. शुभ कार्य सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.
Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सूर्य देव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी स्नान, दान आणि पूजा केल्याने विशेष फळ मिळते. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत....
सुर्यदेवाचे आभार मानण्याचा दिवस..
मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि उत्तरायण सुरू होते. हा सण नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक आहे आणि भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी हा सण ओळखला जातो. मकर संक्रांत म्हणजे नवीन पिकाच्या आगमनाचा उत्सव. या दिवशी शेतकरी सूर्यदेवाचे आभार मानतात, ज्याने त्यांना चांगले पीक दिले. या सणात सूर्यदेवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, सूर्य देव सर्व प्राणिमात्रांना जीवन देतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरिबांना दान करणे पुण्य मानले जाते. या दिवशी तिळाचे लाडू किंवा तिळाचे इतर पदार्थ खाणे देखील शुभ मानले जाते.
मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त
वैदिक पंचांगानुसार पौष महिन्याची प्रतिपदा तिथी 14 जानेवारी मंगळवार पहाटे 3.56 वाजता सुरू होईल आणि 15 जानेवारी बुधवारी पहाटे 3.21 वाजता समाप्त होईल. 14 जानेवारी रोजी सूर्य देव धनु राशी सोडून सकाळी 9.03 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतरच शाही स्नानाचा शुभ काळ सुरू होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 05.27 ते 06.21 पर्यंत असेल. मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाल सकाळी 08.54 ते 04.45 पर्यंत असेल. या दोन शुभकाळात स्नान, दान आणि पूजा केल्याने विशेष फळ मिळते.
मकर संक्रांतीच्या दिवशी 'अशी' पूजा करा
- मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
- सूर्यदेवाला गंगाजलाने स्नान घालावे आणि त्यांना फुले, चंदन, रांगोळी, सिंदूर इत्यादी अर्पण करावे.
- सूर्यदेवाच्या विविध मंत्रांचा जप करा आणि त्यांची स्तुती करा.
- सूर्यदेवाला अन्न अर्पण करा. तुम्ही त्यांना फळे, मिठाई किंवा इतर भोग देऊ शकता.
- शेवटी सूर्यदेवाची आरती करावी.
- या दिवशी गरिबांना दान करा.
- तीळ दान करणे विशेषतः शुभ मानले जाते.
मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे?
स्नान: गंगा किंवा इतर पवित्र नदीत स्नान करा.
दान: गरीबांना कपडे, अन्न इत्यादी दान करा.
तिळाचे सेवन : तिळाचे लाडू किंवा तिळाचे इतर पदार्थ खा.
ब्लँकेट दान : गरिबांना ब्लँकेट दान करा.
मकर संक्रांतीचे महत्त्व
मकर संक्रांत हा नवीन सुगीचे स्वागत करण्याचा सण आहे. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो. शुभ कार्य सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरिबांना दान करणे पुण्य मानले जाते.
हेही वाचा>>>
Makar Sankranti 2025 Wishes In Marathi: मकर संक्रांतीच्या गोड अन् हटके मराठमोळ्या शुभेच्छा द्या! सणाचा गोडवा आणखी वाढवा..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )