Maghi Ganesh Jayanti 2025 : आज माघी गणेश जयंती! 'अशी' करा बाप्पाची आराधना; वाचा पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्ताची अचूक वेळ
Maghi Ganesh Jayanti 2025 : माघी गणेश जयंती 1 फेब्रुवारीला आहे. तसेच, या दिवशी तिलकुंद चतुर्थीदेखील साजरी केली जाणार आहे. या दिवशी बाप्पाच्या प्रसादात जास्तीत जास्त तिळाचा वापर करण्यात येतो.

Maghi Ganesh Jayanti 2025 : हिंदू धर्मग्रंथानुसार, माघ महिन्याला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात माघ महिना फार महत्त्वाचा मानला जातो. तसेच, फेब्रुवारी महिना देखील खास असणार आहे. कारण फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच आज 1 फेब्रुवारी रोजी माघी गणेश (Lord Ganesh) जयंती आहे. हिंदू धर्ममान्यतेनुसार, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणरायाच्या आशीर्वादाने केली जाते. गणेशोत्सवाप्रमाणे माघ महिन्यात दीड दिवसांसाठी बाप्पा घरी विराजमान झाले आहेत.
माघी गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थीदेखील साजरी केली जाते. या दिवशी बाप्पाच्या प्रसादात जास्तीत जास्त तिळाचा वापर करण्यात येतो. मोदकामध्ये तिळ आणि गुळाचा अधिक वापर करण्यात येतो. काही ठिकाणी गणेश जयंतीला हळद किंवा कुंकवाचा वापर करुन मूर्ती बनविण्यात येते. या दिवशी गणपतीला लाल वस्त्र, लाल फूल, लाल चंदन आणि लाल मिठाई अर्पण करण्यात येते. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. गणेश जयंतीला व्रत ठेवल्याने विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात. गणेश जंयतीच्या दिवशी चंद्रद्रर्शन करू नये.
माघी गणेश जयंती 2024 पूजेसाठी शुभ मुहूर्त
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी आज 1 फेब्रुवारीला आहे. 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी शुभ मुहूर्ताची वेळ सुरु होणार आहे. तर, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 14 मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहील. या काळात भगवान गणेशाची विधीवत पूजा केली जाते. 1 फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 38 मिनिटांपासून सुरु होणार आहे. तर, दुपारी 01 वाजून 40 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे.
गणेश जयंती पूजा विधी
- गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी पाण्यात तीळ टाकून स्नान करावे. तसेच, लाल वस्त्र परिधान करून उपवासाचे व्रत करावे.
- ईशान्य दिशेला लाकडी चौरंग ठेवा. त्यावर कलश स्थापित करा.
- त्यानंतर गंगेच्या पाण्यात तीळ मिसळलेल्या पात्रात धातूपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घालावे.
- गौरीपुत्र गणेशाला कुंकू, हळद, शेंदूर, अक्षता, चंदन, अबीर, गुलाल, अष्टगंध, मेहंदी, लाल फूल, लवंग, वेलची, अत्तर, सुपारी, कापड, नारळ अर्पण करा.
- 'श्री गणेशाय नमः दुर्वाकुरान समर्पयामि।. मंत्राचा उच्चार करताना 11 किंवा 21 दुर्वा जोडून अर्पण करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
February Month Lucky Zodiacs : फेब्रुवारी महिना 'या' 4 राशींसाठी ठरणार लकी; चुंबकासारखा पैसा हातात खेळणार, आरोग्यही राहील ठणठणीत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
