Chandra Grahan 2022 : 80 वर्षानंतर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी असणार चंद्रग्रहण; 'या' सहा राशींच्या लोकांचं नशीब बदलेल तर 'यांनी' राहा सावध
चंद्रग्रहणामुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये अनेक बदल होतील.
Lunar Eclipse : यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण (Lunar Eclipse) आज (16 मे) होणार आहे. आज बुद्ध पौर्णिमा देखील आहे. योग 80 वर्षानंतर असा योग आज आला आहे. ग्रहणाच्या वेळी चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये असणार आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणामुळे अनेक महिन्यांपर्यंत काही राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये अनेक बदल होतील. या दिवशी परिघ योगामध्ये बुद्ध पौर्णिमेला चंद्रग्रहण साजरे केले जाईल.
यंदाच्या वर्षी दोन वेळा चंद्रग्रहण असणार आहे. हे दोन्ही पूर्ण चंद्रग्रहण असणार आहेत. पहिले ग्रहण हे आज (16 मे) होणार आहे तर दुसरे हे आठ नोव्हेंबर रोजी असणार आहे. आज असणारे चंद्रग्रहण हे सकाळी 7 वाजून 58 मिनीटांनी सुरू होईल तर 11 वाजून 58 मिनीटांना संपेल. पण हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा सूतक काळ देखील पाळला जाणार नाही. ग्रहण काळात कोणतेही धार्मिक आणि शुभ कार्य केले जात नाही.
इथे दिसेल आजचे चंद्रग्रहण
भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही. पण या वर्षाचे पहिले पूर्ण चंद्रग्रहण हे दक्षिण-पश्चिम यूरोप, आशिया, अफ्रीका, उत्तरी अमेरिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, हिंद महासागर या भागांमध्ये हे ग्रहण दिसेल. चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधी सूतक काळ सुरू होतो. हा काळ चंद्रग्रहणाचा कालावधी संपल्यावर समाप्त होतो.
या सहा राशींच्या लोकांना होईल धनलाभ, तर ही रास असणाऱ्यांनी राहा सावध
पंडित सुरेश श्रीमाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी महालक्ष्मी योग, सर्वार्थ सिद्धि योग, अमृत सिद्धि योग हे योग आहेत. ज्यामुळे मेष, कन्या, मकर, मीन, सिंह, मिथुन या राशींच्या लोकांना धनलाभ होईल. तसेच या राशींच्या लोकांचे न झालेले काम हे आजच्या दिवशी पूर्ण होईल. ग्रहणात सुतक कालावधी नसला तरीही या दिवशी दान करावे. आजच्या दिवशी दान आणि तप करण्याचे विशेष महत्त्व आहे. कर्क, तूळ, वृश्चिक, धनु ,वृषभ आणि कुंभ या राशींच्या लोकांनी आजच्या दिवस सावध राहावे.
ग्रहणाच्या सूतक काळामध्ये 'या' गोष्टींकडे घ्या विशेष काळजी
1. चंद्रग्रह शांती पाठ म्हणा आणि मंत्रांचा जप करा.
2. सूतक काळात स्वयंपाक करणे टाळा.
3. ग्रहणाच्या वेळी केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये मातीपासून तयार केलेल्या पणत्यांचा वापर करा.
4. सूतक काळामध्ये नकारात्मक विचार करु नये.
5. गर्भवती असणाऱ्या महिलांनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
Chandra Grahan 2022 : 'या' राशींच्या लोकांसाठी चंद्रग्रहण ठरणार लाभदायक, होतील अनेक फायदे