एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

Rajyog : तब्बल 50 वर्षांनंतर लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती; 'या' राशींना येणार अच्छे दिन, घरात पैशांची आवक वाढणार

Laxmi Narayan Yog : बऱ्याच वर्षांनंतर लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे, यामुळे मिथुन राशीसह काही राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल. या राशींना आर्थिक लाभासोबतच नोकरी आणि व्यवसायात भरघोस यश मिळेल.

Laxmi Narayan Yog : ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी नारायण योग अतिशय शुभ मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार झाला तर त्याला सुख-समृद्धीसोबतच प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. अशा व्यक्तींना भौतिक सुखाची प्राप्ती होते. जेव्हा कुंडलीत एकाच घरात शुक्र आणि बुध एकत्र येतात, तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो. यावेळी मेष राशीमध्ये बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग (Laxmi Narayan Yog) तयार झाला आहे.

काही राशीच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ होईल, त्यांना व्यवसायात यश मिळेल आणि प्रेमसंबंध देखील चांगले राहतील. लक्ष्मी नारायण योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना (Zodiac Signs) प्रचंड फायदा होईल? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. तुम्हाला दीर्घकाळ चाललेल्या आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. कुटुंबाची प्रत्येक गरज पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावातून मुक्त होऊ शकता. नोकरदारांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याबरोबरच आर्थिक लाभही होऊ शकतो. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. भाऊ-बहिणीमध्ये सुरू असलेल्या अडचणी संपतील. यासोबतच तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता आणि तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प, चांगली डील किंवा ऑर्डर मिळू शकते. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता, या वेळेत तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही लाभ मिळू शकतो.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या योगामुळे या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे तुम्हाला या काळात परत मिळू शकतात. यासोबतच बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. नोकरदार लोकांच्या जीवनावरही याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या पूर्वीच्या गुंतवणुकीतून लाभ मिळवू शकता. या काळात तुम्हाला व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. काही मोठ्या प्रकल्पावर किंवा करारांवर स्वाक्षरी होऊ शकते.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग अत्यंत फलदायी ठरेल. या काळात तुमच्या दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येतील. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात. देवी लक्ष्मीच्या कृपेने वाहन आणि मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तो सुरू करणं फायदेशीर ठरेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. यासोबतच तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाच्या संदर्भात काही प्रवास करावा लागू शकतो, यामध्ये तुम्ही यश मिळवू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Jayanti 2024 Date : शनि जयंती अवघ्या काही दिवसांवर; जाणून घ्या तारीख, मुहूर्त, महत्त्व आणि उपाय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदशेमध्ये भाजपचा दणदणीत विजय, 42 जागांवर मारली बाजीABP Majha Headlines : 01 PM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सIND vs BAN T20 WC 2024 Sunandan Lele : ओपनिंगमध्ये बदल ते पांड्याचे षटकार, विश्वचषकाची सुरुवात दमदारSanjay Shirsat on Sanjay Raut :  राऊतांकडे हेल्मेट घालून जा,  निकालानंतर ते दडगी मारतील...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Mumbai Crime News : मुंबई एअरपोर्टवरील अधिकारी चक्रावले; प्रवाशाच्या गुदद्वारातून बाहेर काढलं लाखोंचं सोनं, पाहा फोटो
प्रवाशाने 'अवघड' जागी सोनं लपवलं, पण कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हुडकून काढलंच, मुंबई एअरपोर्टवर गुदद्वारातून सोन्याची तस्करी
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Deepak Kesarkar: उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
Embed widget