Shani Jayanti 2024 Date : शनी जयंती अवघ्या एका दिवसावर; जाणून घ्या तारीख, मुहूर्त, महत्त्व आणि उपाय
Shani Jayanti 2024 : शनी जयंतीचा दिवस शनी समर्पित आहे. शनी जयंतीला शनीची पूजा केल्याने सर्व संकटं दूर होतात. या वर्षी शनी जयंती नेमकी कधी? जाणून घ्या
Shani Jayanti 2024 : हिंदू धर्मात शनीच्या (Shani Dev) पूजेला विशेष महत्त्व दिलं आहे. ज्योतिषशास्त्रात शनी हा क्रूर आणि न्यायाचा ग्रह मानला जातो. तो सर्वांना कर्माच्या आधारे फळ देतो. शनिवारी शनीची उपासना करणं फलदायी मानलं जातं. पण, शनी जयंतीच्या दिवशी शनीची उपासना केल्यास व्यक्तीला इच्छित फळ मिळतं. वैशाख महिन्यातील शनी जयंती नेमकी कधी ते जाणून घेऊयात.
शनीचा जन्म अमावस्येला झाला, त्यामुळे वैशाख अमावस्येला शनी जयंती असते. यंदाच्या वर्षी शनी जयंती (Shani Jayanti 2024) नेमकी कधी? योग्य तारीख, पूजा मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात.
वैशाख शनी जयंती 2024 तारीख (Vaishakh Shani Jayanti 2024)
ही शनी जयंती 6 जून 2024 रोजी, म्हणजेच गुरुवारी वैशाख अमावस्येला साजरी केली जाईल. उत्तर भारतात शनी जयंती वैशाख अमावस्येला साजरी केली जाते. या दिवशी वट सावित्री व्रत देखील पाळलं जातं.
वैशाख शनी जयंती 2024 मुहूर्त (Vaishakh Shani Jayanti Muhurta)
वैशाख अमावस्या तिथीची सुरुवात - 5 जून 2024, संध्याकाळी 07.54 वाजता
वैशाख अमावस्या तिथी समाप्ती - 6 जून 2024, संध्याकाळी 06.07 वाजता
शनी पूजेची वेळ - संध्याकाळी 05.33 ते 08.33 वाजता
शनी जयंतीचे महत्त्व (Shani Jayanti Significance)
शनी चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ देतात. व्यक्तीच्या जीवनात शनीचा प्रभाव खूप प्रगल्भ जाणवतो. शनीच्या शुभ परिणामामुळे नोकरी-व्यवसायात प्रगती होते. मालमत्ता लाभ, आर्थिक लाभ आणि राजकारणात मोठं पद मिळतं. शनी जयंतीला शनीची पूजा केल्याने कुंडलीतील शनी साडेसाती आणि धैयाचा अशुभ प्रभाव कमी होतो.
शनी जयंती पूजा विधी (Shani Jayanti Puja Vidhi)
शनी जयंतीच्या दिवशी शनीला तिळाचं तेल अर्पण करावं. याबरोबर काळे वस्त्रही अर्पण करावे. शमीच्या झाडाची पानं आणि अपराजिताची निळी फुलं यांचा विशेषत: पूजेत समावेश करावा.
शनी जयंती उपाय (Shani Jayanti Remedies)
तीळ, उडीद, काळी घोंगडी, बदाम, लोखंड, कोळसा इत्यादी गोष्टींच्या दानामुळे शनी प्रभावित होतो. शनी जयंतीला गरजू लोकांना धान्य, पैसे, कपडे, शूज, चप्पल, छत्र्या दान करा. तुम्ही पाणपोईचे मडके देखील दान करू शकता, यामुळे शनी प्रसन्न होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev : शनीने नक्षत्र बदललं; 'या' 3 राशींचा सुवर्ण काळ सुरू, पैशांची होईल भरभराट