Bhagvat Gita : स्वतःचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे का आहे? काय सांगितले आहे भगवद गीतेत?
Bhagvat Gita : . गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक असून ती माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. जीवनातील सर्व दुविधा आणि समस्यांचे समाधान गीतेत सापडते.
Bhagvat Gita : श्रीमद भागवद गीतेत महाभारत युद्धाच्या वेळी भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेल्या शिकवण आहे. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक असून ती माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत, ज्यामध्ये धर्माच्या मार्गावर चालत चांगले कर्म करण्याचे शिक्षण देण्यात आली आहे.
जीवनातील सर्व दुविधा आणि समस्यांचे समाधान गीतेत सापडते. असे मानले जाते की गीतेतील वचनांचे पालन केल्याने माणसाच्या जीवनात अमुलाग्र बदल होतात आणि माणसाला प्रत्येक कामात यश मिळते. श्रीमद भागवत गीतेत अशा पाच गोठी सांगितल्या आहेत, ज्या केल्याने कोणत्याही कामात आपण सहज यशस्वी होऊ शकतो.
गीतेतील महत्त्वाच्या गोष्टी
गीतेत सांगीतल्यानुसार, श्रीकृष्णाच्या मते, एखाद्या व्यक्तीने स्वतःचे मूल्यांकन करणे देखील खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःशी संबंधित कोणताही निर्णय ठामपणे घेऊ शकणार नाही. जेव्हा माणसाला त्याचे गुण आणि उणीवा कळतात तेव्हाच तो आपले व्यक्तिमत्त्व योग्य प्रकारे घडवू शकतो.
गीतेनुसार माणसाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. जेव्हा राग येतो तेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवरील ताबा गमावते आणि रागाच्या भरात चुकीच्या गोष्टी करते. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात ज्यामुळे व्यक्तीला नंतर पश्चाताप होतो. म्हणूनच जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा.
श्रीमद भागवत गीतेनुसार प्रत्येक मानवाने आत्मनिरीक्षण केले पाहिजे. आत्मज्ञानानेच माणसाला त्याचे गुण-दोष कळतात. आत्मचिंतन माणसाला योग्य ते चूक ठरवण्यास मदत करते. म्हणूनच काही काळ एकटे राहून आत्मपरीक्षण करा.
गीतेनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. मन खूप चंचल आहे आणि हेच आपल्या दु:खाचे कारण आहे. मनावर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती यशाच्या मार्गावर चालते. अशी व्यक्ती केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करते आणि ध्येय सहज साध्य करते.
श्रीकृष्णाच्या शिकवणीनुसार मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते. त्यामुळे परिणामांचा विचार न करता केवळ कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या