Kartik Month 2023: कार्तिक महिन्यात 'या' वेळी तोडू नये तुळशीची पानं; ओढावेल आर्थिक संकट
कार्तिक महिन्यात तुळशीचं महत्त्व अधिक असतं. या काळात तुळशीची मनोभावे पूजा करणं आणि तुळशीला जल अर्पण करणं शुभ मानलं जातं. पण या वेळी ठराविक काळात तुळशीच्या रोपाला स्पर्श करणं अशुभ मानलं जातं.
Tulsi Puja Niyam: कार्तिक महिना (Kartik Month) हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये, कार्तिक महिना भगवान विष्णूच्या सर्वात आवडत्या महिन्यांपैकी एक आहे. 29 ऑक्टोबरपासून सुरू झालेला कार्तिक महिना 27 नोव्हेंबरला संपत आहे. तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी व्यतिरिक्त भगवान विष्णूचा देखील वास असतो. कार्तिक महिन्याच्या शेवटी तुळशी मातेचा भगवान शालिग्रामशी विवाह (Tulsi Vivah) सोहळा संपन्न होतो.
कार्तिक महिन्यात तुळशी मातेची पूजा केल्यास पूर्ण फळ मिळतं. त्यामुळे या काळात काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, कार्तिक महिन्यात ठराविक काळानंतर चुकूनही तुळशीची पानं तोडू नयेत, अन्यथा घरामध्ये गरिबी येऊ शकते.
संध्याकाळनंतर तोडू नये तुळशीची पानं
संध्याकाळनंतर तुळशीची पानं तोडणं अशुभ मानलं जातं, असं केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते.
संध्याकाळनंतर तुळशीची पानं का तोडू नये?
संध्याकाळनंतर तुळशीला स्पर्श करणं देखील वर्ज्य मानलं जातं. तुळशीला राधाचं रूप मानलं जातं, त्यामुळे संध्याकाळी ती भगवान श्रीकृष्णासोबत रास गाते. त्यामुळे संध्याकाळी तुळशीची पानं तोडू नये किंवा तुळशीला स्पर्श देखील करू नये, असं म्हणतात.
अंघोळ केल्याशिवाय तुळशीला हात लावू नका
तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे कार्तिक महिन्यात अंघोळ न करता चुकूनही तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये किंवा तुळशीची पूजा करू नये.
तुळशीच्या पूजेचं महत्त्व
कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करणं विशेष फलदायी मानलं जातं. असं मानलं जातं की, या महिन्यात पूर्ण विधीवत तुळशीची पूजा केल्याने त्या व्यक्तीवर भगवान श्री हरी विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा होते. त्यामुळे कार्तिक महिन्यात रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावं. या संपूर्ण महिन्यात संध्याकाळी तुळशीच्या खाली तुपाचा दिवा लावून घरातील गरिबी दूर केली जाऊ शकते.
तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि भगवान श्री हरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज अंघोळ करून ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून तुळशीला जल अर्पण करावं आणि तुळशीसमोर दिवा लावावा. तुळशीची पूजा करताना तुलसी मंत्राचा जप करणं खूप शुभ मानलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Kartik Month 2023: कार्तिक महिना सुरू; या पवित्र महिन्यात 'ही' कामं केल्याने होईल भरभराट