January 2026 Lucky Zodiacs: जानेवारी 2026...इच्छापूर्ती..3 राशींचा भाग्योदय ठरलेला! 5 ग्रहांचे संक्रमण, कशाची कमतरता नसेल, पैसा..नोकरी..प्रेम..
January 2026 Lucky Zodiacs: ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी महिना विशेष असेल. जानेवारीत 5 प्रमुख ग्रहांच्या स्थानांमध्ये होणारे बदल 3 राशीच्या लोकांच्या जीवनात सुख आणतील.

January 2026 Lucky Zodiacs: ते म्हणतात ना, माणसाचे ग्रहमान बदलले की त्याचे नशीबही त्याला साथ देते, त्याच्या जीवनात मोठे बदल व्हायला सुरूवात होते, अशात 2026 हे वर्षही लवकर येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी 2026 महिना ग्रहांचे संक्रमण आणि नक्षत्र बदलांच्या बाबतीत विशेष असेल. जानेवारीमध्ये पाच प्रमुख ग्रहांच्या स्थानांमध्ये होणारे बदल वेगवेगळ्या राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतील. याचा फायदा अनेक राशींना होईल. जाणून घ्या त्या भाग्यशाली राशींबद्दल...
जानेवारी 2026 मध्ये 5 ग्रहांच्या हालचालीत बदल, 3 राशी भाग्यशाली..
ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 वर्षी अनेक ग्रहांच्या हालचाली बदलतील, ज्यामुळे अनेक राशीच्या लोकांचे जीवन प्रभावित होईल. जानेवारीमध्ये सूर्य, मंगळ आणि शुक्र यांच्यासह अनेक मोठ्या ग्रहांचे संक्रमण होईल. 10 जानेवारी रोजी सूर्य आपले नक्षत्र बदलेल आणि 15 जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. बुध तीन वेळा संक्रमण करेल. 17 जानेवारी रोजी मकर राशीत प्रवेश करेल. मंगळ दोनदा संक्रमण करेल. 16 जानेवारी रोजी मकर राशीत प्रवेश करेल. 13 जानेवारी रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करेल, त्यानंतर तीन वेळा संक्रमण करेल. शनि मीन राशीत राहील आणि 20 जानेवारी रोजी उत्तरभाद्रपदात प्रवेश करेल.
2026 मध्ये 3 राशींसाठी जानेवारी महिना भाग्याचा..
मिथुन (Gemini)
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीसाठी जानेवारी महिना खूप खास राहील. तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक लाभ होईल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. कामावर तुमची प्रशंसा होईल. विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी असेल.
मकर (Capricorn)
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांना जानेवारीमध्ये त्यांच्या मेहनतीचे आणि जबाबदारीचे फळ मिळेल. तुमच्या आयुष्यातील सततच्या समस्या आणि आव्हाने संपतील. आदर वाढेल आणि तुम्ही धार्मिक तीर्थयात्रेला जाऊ शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, तुळ राशीला अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुम्हाला पैसे मिळतील आणि बचत करता येईल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या प्रेम जीवनासाठी हा चांगला काळ असेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला तुमच्या शिक्षणात यश मिळेल.
हेही वाचा
Margashirsh Amavasya 2025: मार्गशीर्ष अमावस्या नेमकी 19 की 20 डिसेंबरला? यंदा 3 राशींचं नशीब पालटणार! तिथी, महत्त्व, शुभ काळ जाणून घ्या...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


















