एक्स्प्लोर

IPL 2024: आजपासून इंडियन प्रीमियर लीगचा थरार; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या, टीमच्या कर्णधारांचं आयपीएल किस्मत कनेक्शन

IPL 2024 CSK vs RCB: आयपीएल 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यावेळी अनेक अर्थाने खास असणार आहे. जाणून घ्या टीम कॅप्टनशी संबंधित खास गोष्टी अंकशास्त्रातून जाणून घेऊया

IPL 2024 CSK vs RCB : अखेर तो क्षण आलाच, शुक्रवारपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यानं आयपीएलचा शुभारंभ होणार आहे. गतवेळचा विजेता चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये थरार पाहायला मिळणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये एकापेक्षा एक धुरंधर खेळाडू आहेत. दोन्ही संघातील स्टार खेळाडू कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतात. ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. दोन्ही संघाचे कर्णधार देखील खास आहे.  अंकशास्त्रात  जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. त्याप्रमाणेच या कर्णधारांचा भाग्यशाली क्रमांक कोणता आहे आणि कोणती गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते हे अंकशास्त्रावरून जाणून घेऊया.

चेन्नई सुपर किंग्स (CSK)  

चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा चॅम्पियन बनवणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यावेळी संघाचे नेतृत्व करणार नाही. यावेळी ऋतुराज गायकवाडवर  संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.  महेंद्रसिंग धोनी 2008 पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. मात्र, धोनीची ही शेवटची आयपीएल असेल आणि यानंतर तो निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी चर्चा आहे.अंकशास्त्रानुसार 7 जुलै 1981 रोजी जन्मलेल्या धोनीचा मूळ क्रमांक 7 आहे. या संख्येचा स्वामी ग्रह केतू आहे. या मुलांकाचे लोक स्वतंत्र विचार करणारे आहेत आणि असामान्य व्यक्तिमत्त्व आहेत. हे लोक कधीही शांत बसतात आणि नेहमी काही बदल करत राहतात.मुलांर 7 असलेल्या लोकांची कल्पनाशक्ती खूप तीक्ष्ण असते. स्वभावाने हे लोक अतिशय धाडसी आणि आत्मविश्वासाने भरलेले असतात. या लोकांना समाजात खूप मान मिळतो.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)  

ऋषभ पंत 15 महिन्यांनंतर मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद पुन्हा एकदा त्याच्याकडे सोपवण्यात आले आहे.  पंत गेल्या वर्षी एका कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. यामुळे तो गेल्या मोसमात खेळू शकला नव्हता. डेव्हिड वॉर्नरने आयपीएल 2023 मध्ये त्याच्या जागी दिल्लीची जबाबदारी स्वीकारली होती. अंकशास्त्रानुसार ४ ऑक्टोबर 1997 रोजी जन्मलेल्या ऋषभ पंतचा मुलांक 4 आहे. या संख्येचा स्वमी ग्रह राहू आहे.या क्रमांकाचे बहुतेक लोक खेळाडू, शास्त्रज्ञ किंवा राजकारणी आहेत. स्वभावानुसार, या मुलांकाचे लोक गर्विष्ठ आणि हट्टी असतात.हे लोक स्वभावाने मनमिळाऊ असतात. त्यांना आयुष्यात अनेकदा संघर्ष करावा लागतो पण ही माणसे कधीच हिंमत हरत नाहीत. त्याचे भाग्यवान क्रमांक 4,13,22 आणि 31 आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स  (Kolkata Knight Riders) 

आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. दुखापतीमुळे अय्यर गेल्या मोसमात खेळू शकला नव्हता. आता  त्याची स्फोटक फलंदाजी पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.अंकशास्त्रानुसार, 6 डिसेंबर 1994 रोजी जन्मलेल्या श्रेयस अय्यरचा मुलांक 6 आहे. या मुलांकाचा स्वामी ग्रह शुक्र आहे जो सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यांचे जीवन भौतिक सुखाने भरलेले असते. हे लोक आनंदी असतात आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेतात. त्याचे भाग्यवान क्रमांक 6,15 आणि 24 आहेत.

लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants)

 लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधारपद केएल राहुलकडे आहे. गेल्या आयपीएल मोसमात राहुल दुखापतीमुळे काही मॅचनंतर बाहेर होता. गेल्या मोसमात राहुलच्या अनुपस्थितीत कुणाल पांड्याने संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. मात्र, यावेळी केएल राहुल आयपीएलच्या सुरुवातीलाच फिट झाला आहे. केएल राहुलचा जन्म 18 एप्रिल 1992 रोजी झाला. अंकशास्त्रानुसार केएल राहुलचा मूळ क्रमांक 9 आहे. या क्रमांकाच शासक ग्रह मंगळ आहे. मंगळ हा उत्साह आणि उर्जेचा ग्रह आहे. या मुलांकाचे लोक उत्साही स्वभावाचे असतात. तसेच लोक शिस्तबद्ध असतात आणि त्यांच्या तत्त्वांना चिकटून राहतात. काही प्रमाणात त्यांचे जीवन संघर्षमयच राहते. हे लोक खूप कलात्मक असतात. हे लोक उच्च दर्जाचे शिक्षण घेतात. त्यांचे भाग्यवान क्रमांक 9, 18 आणि 27 आहेत.

गुजरात टायटन्स  (Gujarat Titans)

यावेळी गुजरात टायटन्सचे नेतृत्व युवा स्टार शुभमन गिल करणार आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यानंतर गिलला गुजरात टायटन्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 2022 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. अशा स्थितीत कर्णधारपदासह चांगली कामगिरी दाखवण्याचे आव्हान गिलसमोर असेल. अंकशास्त्रानुसार 8 सप्टेंबर 1999 रोजी जन्मलेल्या शुभमन गिलचा मूळ क्रमांक 8 आहे. या मुलांकाचा स्वामी शनिदेव आहे. या क्रमांकाचे लोक प्रसिद्धीपासून दूर राहून हे लोक आपले काम पूर्ण निष्ठेने करतात. मूलांक 8 चे लोक शांत, गंभीर असतात. या मूलांकाच्या लोकांना हळूहळू यश मिळते. एखादे ध्येय निश्चित केल्यानंतर हे लोक ते निश्चितपणे पूर्ण करतात. हे लोक त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांमुळे कधीही निराश होत नाहीत.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सची कमान सांभाळताना दिसणार आहे. रोहित शर्माच्या जागी त्याच्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. रोहितकडून मुंबईचे कर्णधारपद घेतल्याच्या निर्णयामुळे बहुतांश चाहते संतप्त झाले होते.अंकशास्त्रानुसार, 11 ऑक्टोबर 1993 रोजी जन्मलेल्या पांड्याचा मूलांक 2 आहे. या क्रमांकाचा शासक ग्रह चंद्र आहे. या मूलांकाचे लोक अत्यंत कल्पक, भावनिक आणि स्वभावाने साधे असतात. हे लोक सर्जनशीलतेने परिपूर्ण असतात. हे लोक जन्मजात कलाकार असतात. हे लोक इतरांच्या कल्याणाची पूर्ण काळजी घेतात. हे लोक शिक्षणाबाबत असमाधानी आहेत. 1,2, 4 आणि 7 हे त्यांचे भाग्यवान अंक आहेत.

पंजाब किंग्ज (Punjab Kings) 

आयपीएल 2024 साठी पंजाब किंग्जचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्णधार धवन प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात परतणार आहे. गेल्या मोसमात त्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती पण काही सामन्यांनंतर त्याची कामगिरी फिकी पडली.अंकशास्त्रानुसार, 5 डिसेंबर 1985 रोजी जन्मलेल्या धवनचा मूलांक 5 आहे. या  नंबरचा शासक ग्रह बुध आहे जो ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक आहे. या मुलांकाचे लोक खूप हुशार, धाडसी आणि मेहनती असतात. हे लोक प्रत्येक आव्हानाला आव्हान म्हणून स्वीकारतात. ते परिस्थितीशी जुळवून घेतात. हे लोक इतरांशी अगदी सहज मैत्री करतात. त्यांचे प्रेमसंबंध टिकत नाहीत. त्यांच्यासाठी भाग्यवान क्रमांक 5,14 आणि 23 आहेत.

राजस्थान रॉयल्स (Royal Challengers Bangalore)

संजू सॅमसन पुन्हा एकदा आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद स्वीकारणार आहे. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने 2008 साली विजयाची नोंद केली होती. त्यानंतर संघाला अद्याप विजेतेपद मिळालेले नाही. गेल्या मोसमात या संघाने विशेष कामगिरी केली नाही. अशा स्थितीत त्याच्याकडून यावेळी चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा असतील. संजू सॅमसनचा जन्म 11 नोव्हेंबर 1994 रोजी झाला. अंकशास्त्रानुसार त्याची मूळ संख्या 2 आहे. मूलांक 2 असल्यामुळे चंद्र हा त्यांच्या ग्रहाचा स्वामी आहे. हे लोक बुद्धीमान असतात. त्याचे भाग्यवान अंक 1,2, 4 आणि 7 आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore)

 फाफ डू प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार आहे. डू प्लेसिसने 130 सामने खेळताना आयपीएलमध्ये सर्वाधिक 96 धावांसह 33 अर्धशतके झळकावली आहेत.  अंकशास्त्रानुसार, 13 जुलै 1984 रोजी जन्मलेल्या फाफ डु प्लेसिसचा क्रमांक 4 आहे. त्याच्या मूलांकाचा शासक ग्रह राहू आहे. राहूच्या प्रभावाखाली असलेले बहुतेक लोक खेळाडू, वैज्ञानिक किंवा राजकारणी बनतात. ते त्यांच्या क्षेत्रात खूप तज्ञ आहेत.4 क्रमांकाचे लोक स्वभावाने हट्टी असतात. तथापि, हे लोक समस्यांना तोंड देताना कधीही हिंमत गमावत नाहीत. त्याचे भाग्यवान क्रमांक 4,13,22 आणि 31 आहेत.

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करणार आहे. 2023 चा वनडे विश्वचषक ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली जिंकला होता   कमिन्स आणि त्याचा साथीदार ट्रॅव्हिस हेड यांच्या आगमनाने संघाची स्थिती अधिक भक्कम झाली आहे.  अंकशास्त्रानुसार, 8 मे 1993 रोजी जन्मलेल्या कमिन्सची मूळ संख्या 8 आहे. या क्रमांकाच्या लोकांवर शनिदेवाची कृपा होते. या नंबरचे लोक अतिशय शांत स्वभावाचे असतात. शनिदेवाच्या कृपेने मूलांक 8 चे लोक कोणत्याही कामात यश मिळवतात. या मूलांकाचे लोक कठोर परिश्रम करतात आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणींना धैर्याने सामोरे जातात. त्याचे भाग्यवान क्रमांक 8, 17 आणि 26 आहेत. 

हे ही वाचा :

Holi 2024: धुळवडीवर चंद्रग्रहणाचे सावट! यंदा ग्रहणात लहान मुलांनी रंग खेळावा का? ज्योतिषाचार्य अनीष व्यास सांगतात...

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Embed widget