एक्स्प्लोर

Horoscope Today, June 8, 2022 : मेष, वृषभसह ‘या’ राशींवर होणार धनाचा वर्षाव! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, June 8, 2022 : वृषभ, मिथुनसह अनेक राशींना आज आर्थिक लाभ होणार आहे. सिंह आणि वृश्चिक राशिंसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे.

Horoscope Today, June 8, 2022 : आज चैत्र नवरात्री सप्तमीच्या शुभ दिवशी चंद्र मिथुन राशीत आहे आणि आद्रा नक्षत्र आहे. गुरु कुंभ राशीत आहे. शनि सध्या मकर राशीत आहे. वृषभ, मिथुनसह अनेक राशींना आज आर्थिक लाभ होणार आहे. सिंह आणि वृश्चिक राशिंसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक अडथळे दूर होतील. भविष्यात फायदेशीर ठरतील अशी कंत्राटे मिळतील. नोकरी व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आज तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. दिनचर्येत काही बदल करावे लागतील. ऑफिसमध्ये तुम्हाला काही खास लोकांशी काही महत्त्वाच्या विषयावर बोलण्याची संधी मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope) : आर्थिक समस्या दूर होईल आणि तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. कोणत्याही नवीन प्रकल्पामुळे धनलाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी मान-प्रतिष्ठा वाढू शकते. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे, अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकाऱ्यांची मदत मिळेल, त्यामुळे काम लवकर पूर्ण होईल. गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope) : अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक कार्यात मदत करण्याचा विचार कराल. व्यवसायात नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास नफा मिळेल. काही महत्त्वाच्या कामासाठी केलेला प्रवास सुखकर होईल. चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक क्षेत्रात येणारे अडथळे दूर होतील. धनप्राप्तीच्या संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी पूर्ण उत्साहाने सक्रिय राहाल. आपल्या कामात नवीन रणनीती घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे. शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास आर्थिक फायदा होऊ शकतो. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे.

सिंह (Leo Horoscope) : कठोर परिश्रम केल्यावरच यश मिळेल. विरोधक तुम्हाला आव्हान देऊ शकतात. काळजी घ्या. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ अनुकूल नाही. नीट विचार करूनच एखाद्या योजनेत पैसे गुंतवा. आर्थिकदृष्ट्या आज तुम्ही अडचणीत राहू शकता. अचानक धनलाभ झाल्याने आज तुम्ही तुमच्या गरजेच्या वस्तू खरेदी कराल. वैवाहिक जीवनात अधिक गोडवा राहील.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस चांगला जाणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कार्यक्षेत्रात पूर्ण आत्मविश्वासाने सर्व कामे पूर्ण कराल, सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मान-सन्मान मिळेल. व्यापारी वर्गाला नवीन व्यवसायात अनपेक्षित यश मिळेल, लाभाची शक्यता आहे. बेरोजगारांना चांगल्या नोकऱ्या मिळतील. एखाद्याला मदत करण्याची भावना तुमच्या मनात निर्माण होईल. धार्मिक कार्याचे नियोजन कराल.

तूळ (Libra Horoscope) : भविष्य सुधारण्यासाठी योजना बनवाल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुधारतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी लोकांचे सहकार्य मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस खूप शुभ आहे. काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते, पदोन्नती किंवा वेतनवाढीची शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आर्थिक स्थिती अनुकूल राहील. नोकरी व्यवसायासाठी आजचा दिवस सामान्य आहे. जमीन, इमारत, वाहन इत्यादी घेण्याचा विचार करता येईल. जास्त आत्मविश्वासाने चुकीचे निर्णय घेणे टाळा. रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी इतर लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोणाशीही अवास्तव वादात पडणे टाळावे. तुम्हाला काही नवीन काम शिकण्याची संधी मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या कामगिरीचे कौतुक होईल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. तुमच्या कामांची समाजात चर्चा होईल. तुमच्या वागण्याने लोक खुश होतील. व्यवसायाच्या क्षेत्रात इतर लोकांशी संपर्क साधणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या धार्मिक स्थळाच्या यात्रेला जाऊ शकता.

मकर (Capricorn Horoscope) : मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. कार्यक्षेत्रात अडथळे येऊ शकतात, त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. कामाच्या अतिरेकामुळे मन अस्वस्थ राहू शकते. स्थलांतराची शक्यता आहे. व्यवसायाच्या निमित्ताने दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. खाण्यापिण्यात काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांच्या लग्नाची चर्चा सुरु होईल.

कुंभ (Aquarius Horoscope) : नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. एखाद्या विशिष्ट बाबतीत अनुभवी व्यक्तीचा सल्लाही तुम्हाला मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल, ज्यामुळे नातेसंबंधात जवळीक वाढेल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये एखादा नवीन प्रकल्प हाती घेतला जाऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण होतील, नवीन लोक भेटतील.

मीन (Pisces Horoscope) : अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात लाभ होईल. आर्थिक प्रगतीच्या संधी मिळतील. जुन्या कर्जातून सुटका होऊ शकते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना सकारात्मक निकाल मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या कामासाठी मोठा निर्णय घेताना, जोडीदाराचे मत विचारात घ्याल.

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com  वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 23 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सWalmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Horoscope Today 23 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Income Tax Raid At Pushpa 2 Director House: 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Embed widget