एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Horoscope Today, June 15, 2022 : ‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Horoscope Today, June 15, 2022 : मेष राशीसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. वृषभ राशीच्या लोकांचे खाण्या-पिण्यात निष्काळजीपणामुळे आरोग्य मवाळ राहील.

Horoscope Today, June 15, 2022 : आज चंद्र  धनु राशीत आहे आणि मूल नक्षत्र आहे. सूर्य मिथुन राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनि कुंभ राशीत आहे. मेष राशीसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. वृषभ राशीच्या लोकांचे खाण्या-पिण्यात निष्काळजीपणामुळे आरोग्य मवाळ राहील. जाणून घ्या आजचे संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस संमिश्र परिणाम देईल. प्रगती होईल आणि सन्मान मिळेल. सकारात्मक राहिल्याने तुम्हाला कोणतीही परिस्थिती सहजपणे हाताळता येईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंदी वाटेल. जर, तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करा. राग वाढल्याने तुमचे काम बिघडू शकते, त्यामुळे आक्रमकता नियंत्रणात ठेवणे हिताचे आहे. कार्यालयातील उच्च अधिकारी आणि महत्त्वाच्या लोकांशी चर्चा आणि वाद टाळावेत.

वृषभ (Taurus Horoscope) : कामाचा अतिरेक आणि खाण्या-पिण्यात निष्काळजीपणामुळे आरोग्य मवाळ राहील. पुरेशी झोप आणि अन्न न मिळाल्याने मन अस्वस्थ राहील. आज प्रवास न करणे तुमच्या हिताचे आहे. प्रवासात अडथळे येऊ शकतात. वेळेवर काम पूर्ण न झाल्यामुळे मन उदास राहू शकते. गुंतवणुकीची कोणतीही योजना आत्ताच बनवू नका. कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना काळजीपूर्वक वाचा.

मिथुन (Gemini Horoscope) : आज तुमचा दिवस जबाबदाऱ्यांनी भरलेला असणार आहे. कामात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. दैनंदिन दिनचर्येत थोडासा बदल केल्यास तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल. ज्येष्ठ लोकांमध्ये राहिल्याने आत्मविश्वास वाढेल. भविष्यातील योजनाही पूर्ण होतील. मित्र आणि कुटुंबासोबत फिरायला जाल. विश्वासू व्यक्तीशी चर्चा करून कोणतीही समस्या सोडवली जाऊ शकते.

कर्क (Cancer Horoscope) : तुमचा दिवस चांगला जाणार आहे. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. आनंदाच्या गोष्टी घडतील. कोणतेही काम करा, यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. घरातील कुटुंबीयांसह आनंदात वेळ जाईल. नोकरदारांना नोकरीत फायदा होईल. कोणत्याही पॉलिसी इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे. निष्काळजीपणामुळे काही वैयक्तिक कामात व्यत्यय येऊ शकतो. समस्यांबद्दल काळजी करण्याऐवजी, उपाय शोधण्याचा प्रयत्न करा.

सिंह (Leo Horoscope) : एखादी नवी योजना सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुमचे संतुलित आचरण तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत चांगले संतुलन राखण्यास मदत करेल. जवळच्या व्यक्तीशीही चर्चा होऊ शकते. विरोधकांच्या कृतीकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्यावर रागावण्यापेक्षा समजूतदारपणे प्रत्युत्तर द्या, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी सकारात्मक राहा.

कन्या (Virgo Horoscope) : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहणार नाही. अनेक त्रासांमुळे मन अस्वस्थ होईल. नातेवाईकांशी मतभेद होतील. आईच्या तब्येतीची चिंता वाटू शकते. जमीन, घराची कागदपत्रे सांभाळून ठेवा. लोकांशी अधिक वाद घालणे टाळा. जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्यांचा सल्ला तुमच्या कामी येईल. कोणत्याही प्रकारच्या कर्जाच्या व्यवहाराबाबत बोलत असाल तर थोडी काळजी घ्या.

तूळ (Libra Horoscope) : अनुभवी लोकांच्या सहवासात तुम्हाला काही सकारात्मक अनुभव मिळेल. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा कार्यक्रमही होईल. यावेळी घरातील वातावरण योग्य राखणे आवश्यक आहे. मुलांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या अभ्यासात आणि करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. तुमची कोणतीही योजना अयशस्वी होऊ शकते. घरातील समस्येवर जोडीदाराशी चर्चा होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : अनावश्यक खर्च टाळावा लागेल. कुटुंबातील वाद टाळण्यासाठी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात. शारिरीक समस्यांसोबतच मनातही चिंता राहील. यामुळे तुमच्या कामाची गती मंदावेल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. नकारात्मक मानसिकता ठेवू नका. चुकीच्या कामापासून दूर राहा. तुमची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवा. पती-पत्नीमध्ये काही वाद होऊ शकतात.

धनु (Sagittarius Horoscope) : प्रत्येक कामावर लक्ष केंद्रित करा. योग्य दिनचर्या देखील महत्त्वाची आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. पैसा येताच खर्च वाढेल हे ध्यानात ठेवा. विनाकारण रागावू नका. नोकरी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी आजचा काळ अतिशय अनुकूल आहे. परदेश व्यापारातून फायदा होऊ शकतो. धार्मिक आणि शुभ कार्यात रस घ्याल. नातेवाईक आणि मित्रांना भेटून आनंद होईल. आर्थिक लाभ होऊ शकतो. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल.

मकर (Capricorn Horoscope) : धार्मिक कार्यात तुमचा दिवस व्यस्त राहील. काही पैसा सामाजिक कार्यात खर्च होईल. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याशी संभाषण करताना काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमच्या बोलण्याने त्यांचे मन दुखावू शकते. मेहनतीच्या प्रमाणात फळ न मिळाल्यास निराश व्हाल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी योग्य विचार करणे देखील आवश्यक आहे. तुमच्या चुका ओळखा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा.

कुंभ (Aquarius Horoscope) : तुम्ही जितके जास्त कष्ट कराल आणि तुमच्या कामांवर लक्ष द्याल तितके चांगले परिणाम मिळतील. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करणे आवश्यक आहे. जवळच्या नातेसंबंधांबद्दल तुमच्यामध्ये शंका निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होईल. यावेळी वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात अधिक रस घेऊ नका. कार्यालयात विरोधकांपासून सावध राहा. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतील.

मीन (Pisces Horoscope) : सर्व कामे सहज पूर्ण होतील. नशीब तुमच्या सोबत आहे. व्यवसायात बढती शकते. व्यवसायात नफा मिळेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. आर्थिक आणि कौटुंबिक आनंद मिळू शकेल. एखाद्याला दिलेले पैसे आज परत मिळू शकतात. अहंकार आणि अतिआत्मविश्वास यांसारख्या दुर्गुणांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायातील अडथळे आज दूर होऊ शकतात. घरातील वातावरण गोड राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 6 PM : 8 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHaryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणारABP Majha Headlines : 07 PM : 08 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Suraj Chavan: बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
Embed widget