Horoscope Today 6 April 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशींच्या आयुष्यात घडतील हे मोठे बदल; वाचा शनिवारचं राशीभविष्य
Horoscope Today 6 April 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीसाठी आजचा दिवस आरोग्य, शिक्षण, नोकरीच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.
Horoscope Today 6 April 2024 : आजचा वार शनिवार. आजचा दिवस नोकरदार, व्यावसायिक वर्गासाठी खास तर काहींसाठी संघर्षाचा असणार आहे. एकूणच तूळ, वृश्चिक, धनु राशीसाठी आजचा दिवस आरोग्य, शिक्षण, नोकरीच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.
तूळ (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - जे लोक फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करतायत त्यांना आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार आहे. तरच भाग्य तुमच्याबरोबर असेल.
व्यवसाय (Business) - जे लोक नवीन व्यवस्या करू इच्छितात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे कोणताही निर्णय एकट्याने घेऊ नका. तुमचे कुटुंबीय तसेच मित्र-परिवार यांच्याशी आधी चर्चा करा. मगच निर्णय घ्या.
आरोग्य (Health) - आज तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला अॅसिडीटीची समस्या त्रास देऊ शकते. यासाठी तुमच्या आहारावर नीट लक्ष द्या. तेलकट पदार्थ खाऊ नका.
कुटुंब (Family) - तुमच्या जोडीदाराबरोबर आज तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल. नात्यात अधिक समजूतदारपणा दाखवा.
.
वृश्चिक (Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुम्ही कामात अधिक मन गुंतवाल. दिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. तुमच्या कामाने तुमचा बॉसदेखील तुमच्यावर खुश असेल.
व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायातील प्रत्येक छोटी गोष्ट तुमच्या बिझनेस पार्टनरबरोबर शेअर करा. एकट्याने निर्णय घेतल्यास तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज होईल.
कुटुंब (Family) - आज तुम्हाला घराच्या सजावटीसाठी, काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करावी लागू शकते. यासाठी तुमचे पैसे खर्च होऊ शकतात.
आरोग्य (Health) - जर तुमची तब्येत वारंवार बिघडत असेल. आणि त्यासाठी एखादा डाएट प्लॅन करत असाल तर त्याचं नियमित पालन करा. तुमचं शरीर निरोगी राहील.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुमच्यावर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. त्या तुम्ही काहीही करून पूर्ण करणं गरजेचं आहे.
व्यापार (Business) - व्यापारी वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. तुमचा व्यवसाय अगदी छान चालेल. फक्त प्रामाणिकपणे काम करत राहा.
युवक (Youth) - तरूणांनी आपल्या आई-वडिलांचा आदर करावा. त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर रागात देऊ नका. अन्यथा तुमच्या वागणुकीमुळे त्यांना मानसिक त्रास होऊ शकतो.
आरोग्य (Health) - ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी आपल्या आहारावर नीट लक्ष द्यावं. थोडासाही हलगर्जीपणा तुम्हाला महागात पडू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :