Horoscope Today 30 May 2024 : आज 'या' राशींना प्रत्येक कामात नुकसान; तर 'या' राशींना मिळणार शुभवार्ता, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 30 May 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 30 May 2024 : पंचांगानुसार, आज 30 मे 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
व्यवसाय धंद्यामध्ये उच्चपदस्थ व्यक्तींचा सहवास लाभेल. त्याचा फायदा धंद्यासाठी आवश्य करून घ्या.
वृषभ (Taurus Horoscope Today)
सहवासातील वृद्ध व्यक्तींचा सल्ला अवश्य विचारात घ्या. धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घ्याल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
कधीतरी अति संवेदनशीलतेमुळे निराश होण्याचे योग येतील. एखाद्याबद्दल खूप अनुकंपा वाटेल आणि त्यांना मदतही कराल.
कर्क (Cancer Horoscope Today)
जवळच्या नात्यांमधून अपेक्षाभंगाचे दुःख अनुभवाल. कोठेही अंधविश्वास ठेवून काम करू नका.
सिंह (Leo Horoscope Today)
एखादे आव्हान पेलण्याचे मनोरथ कराल, परंतु आपल्या जवळच्या सामर्थ्याचा अंदाज घ्या. नाहीतर निराशा पदरात पडेल.
कन्या (Virgo Horoscope Today)
वैवाहिक जीवनात काही त्रास संभवतील. महिला थोड्या विसरभोळ्या बनतील.
तूळ (Libra Horoscope Today)
आज आरोग्याची काळजी घ्यावी. मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. थोडेसे लहरी आणि विक्षिप्त बनाल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
कोणत्याही कामाचा जास्त ताण घेऊ नका. अति स्पष्टपणाने आणि परखड बोलण्याने सहवासातील जवळच्या लोकांची मने दुखावली जातील.
धनु (Sagittarius Horoscope Today)
नोकरीत वरिष्ठांशी जमणार नाही. कामामध्ये सतत नाविन्य शोधण्याकडे आणि बदलण्याकडे कल राहील.
मकर (Capricorn Horoscope Today)
संपत्ती स्थितीमध्ये चढ-उतार होऊ शकतात. मुलांच्या विचित्र वागण्यामुळे थोडे वैतागून जाल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
घरामध्ये कित्येक वेळा एकांगी विचार कराल आणि असे विचार जवळच्या लोकांना रुचणार नाही.
मीन (Pisces Horoscope Today)
महिलांनी ताण कमी करण्यासाठी प्राणायाम आणि ओंकार याचा आधार घ्यावा. व्यापारातील बौद्धिक झेप वाढेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: