एक्स्प्लोर

जूनमध्ये सूर्य, शनिसह 6 मोठ्या ग्रहांच्या चाली बदलणार; 'या' 4 राशींची डोकेदुखी वाढणार, संकटं येण्याआधीच व्हा सतर्क

Astrology : जून महिन्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली पाहायला मिळणार आहेत, याचा खोल परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होईल. काहींसाठी ग्रहांचं हे संक्रमण शुभ ठरेल, तर काही राशींना जून महिन्यात मोठा फटका बसणार आहे.

Planet Prediction in June : जून महिन्यात सूर्य आणि शनिसह अनेक मोठे ग्रह चाल बदलणार आहेत. याची सुरुवात मंगळ ग्रहापासून होईल, मंगळ 1 जून रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच युरेनस देखील त्याच दिवशी राशी परिवर्तन करेल. यानंतर 3 जून रोजी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल. 14 जून रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मिथुन राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर 29 जून रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत जाईल.

त्यानंतर महिन्याच्या मध्यात, म्हणजे 15 जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल, यावेळी मिथुन राशीत 3 ग्रह एकत्र येऊन त्रिग्रही योग निर्माण होईल. महिन्याच्या शेवटी, म्हणजेच 29 जूनला शनि कुंभ राशीत वक्री चाल चालेल. ग्रहांच्या या स्थितीमुळे काही राशींचा शुभ काळ सुरू होईल, तर काही राशींवर एका मागोमाग एक संकटं येतील. मुख्यत्वे 4 राशींना या काळात संकटाचा सामना करावा लागेल, या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini)

जून महिन्यात मिथुन राशीच्या लोकांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या कामात फारसं समाधान मिळणार नाही आणि तुम्हाला पैसे मिळवण्यात काही अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. व्यावसायिकांना प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल आणि व्यावसायिक कामकाजात विलंब होऊ शकतो. जास्त धावपळ केल्याने पाय दुखण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, अहंकारामुळे नातेसंबंधांमध्ये परस्पर समंजसपणाचा अभाव असू शकतो.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांना निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी घुसमट झाल्यासारखं वाटू शकतं आणि वरिष्ठांमुळे कामात अडचणी येऊ शकतात. व्यावसायिक जीवनात थोडा निष्काळजीपणा केल्यामुळे तुम्ही कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता, त्यामुळे या सर्वापासून सावध राहा, निष्काळजीपणा टाळा. कोणत्याही मित्राला सिक्रेट सांगणं टाळा, अन्यथा बदनामी होण्याची शक्यता आहे. या महिन्यात कौटुंबिक सदस्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो.

मकर रास (Capricorn)

जूनमध्ये मोठ्या ग्रहांच्या हालचालीमुळे मकर राशीच्या लोकांना सतर्क राहावं लागेल. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा दोन्ही बाबतीत तुमचं नुकसान होऊ शकतं. पैशाशी संबंधित बाबींमध्ये जोखीम घेणं टाळा. नोकरदार लोकांना सहकाऱ्यांमुळे अडचणी येऊ शकतात, त्यामुळे ते नोकरी बदलण्याचा विचार करतील. या महिन्यात तुम्ही कोणतंही काम कराल, तुम्हाला त्याची योग्य किंमत मिळणार नाही, जे तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनेल. तुमच्या वडिलांसोबतचे तुमचे संबंध बिघडू शकतात, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात अशांतता येईल.

मीन रास (Pisces)

जून महिन्यात ग्रहांच्या राशी बदलामुळे मीन राशीच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तुम्हाला तुमच्या कृतींबाबत सावध राहावं लागेल आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक बाबींवरही लक्ष द्यावं लागेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. व्यावसायिकांना त्यांच्या योजनांकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्या वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. लव्ह लाईफमध्ये काही गैरसमज वाढू शकतात, ज्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावं लागेल, अन्यथा तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या पराभवाला फक्त 'ही' एक गोष्ट ठरणार कारणीभूत; अनिल थत्तेंची सनसनाटी भविष्यवाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget