एक्स्प्लोर

Horoscope Today 29 February 2024 : आजचा गुरुवार खास! दत्तगुरुंची 'या' राशींवर राहील विशेष कृपा; जाणून घ्या 12 राशींचं भविष्य

Horoscope Today 29 February 2024 : आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीलं आहे? कोणासाठी आजचा दिवस शुभ किंवा कोणासाठी आजचा दिवस अशुभ? हे समजून घेण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य..

Horoscope Today 29 February 2024 : आजचा दिवस, गुरुवार 29 फेब्रुवारी 2024, काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. जर तुम्ही नवीन नोकरीसाठी मुलाखत दिली असेल तर आज तुम्हाला एक मोठी आणि चांगली ऑफर मिळू शकते, ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त पगार मिळेल. या नवीन नोकरीच्या ऑफरमुळे भविष्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, तुमचा व्यवसाय खूप समाधानकारक नफ्यात असेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो, परंतु तुमचे खर्चही तितकेच वाढतील, ज्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवाल, परंतु वाईट संगतीतील मित्रांशी कधीही संबंध ठेवू नका, अन्यथा तुम्हीहा चुकीच्या संगतीत पडू शकता. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत एखाद्या मंदिरात वैगेरे जाऊ शकता, तिथे तुम्हाला खूप शांती मिळेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. हवामानातील बदलामुळे खोकला, सर्दी होऊ शकते.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी चांगलं वागलं पाहिजे. त्यांच्याशी चांगलं वागून तुम्ही काम वेळेवर पूर्ण करू शकाल, तुमचे सहकारीही तुम्हाला चांगली साथ देतील.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात कुठेतरी बाहेर प्रवास करू शकता, जिथे तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकेल. आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. आज तुम्हाला तुमचे कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील.

कौटुंबिक (Family) - आज आई-वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमचं तुमच्या जोडीदारासोबतचं नातं बहरेल आणि तुमच्या घरातही शांततेचं वातावरण असेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवणार नाही. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस खूप व्यस्त असेल. आज कामाचा ताण खूप जास्त असेल, त्यामुळे तुमचा दिवस तणावात जाईल आणि संध्याकाळी तुम्हाला थकवाही जाणवू शकतो.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा बिझनेस चांगली प्रगती करेल, फक्त तुमचा बिझनेस पुढे नेण्यासाठी मेहनत करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल.

विद्यार्थी (Student) - तुमचं सध्या कुठेतरी लफडं सुरू असेल तर तुमचं लव्ह लाईफ चांगलं राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुमच्या लव्ह लाईफबद्दल सांगण्याची हिंमत करू शकता.

कौटुंबिक (Family) - आज तुमचे तुमच्या कुटुंबातील कोणाशी तरी मतभेद होऊ शकतात. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि बोलण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमची प्रकृती थोडी कमजोर असेल. हवामानातील बदलामुळे शारीरिक समस्या जाणवतील. मुलांच्या बाजूने तुमचे मन समाधानी असेल, परंतु तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी वाटेल.

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये खूप काम करावं लागेल. काम करताना तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, तुमच्या सहकाऱ्यांवर जास्त रागावू नका. अन्यथा तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून मोठा लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुमचं मन दिवसाच्या शेवटी प्रसन्न राहील.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असेल. आज व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि तुमच्या मालाची विक्री कमी झाल्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्ही तुमच्या आजूबाजूच्यांशी किंवा नातेवाईकांशी भांडणं टाळा, अन्यथा तुमचे परस्पर संबंध बिघडू शकतात.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या मित्रांसोबत फिरण्यात जास्त वेळ वाया घालवू नका, त्यापेक्षा तुमचे करिअर घडवण्यावर लक्ष द्या.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. खोकला, सर्दी, तापाने तुम्ही आजारी पडू शकता.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे वाद आज टाळावे, अन्यथा तुमचा बॉस तुमच्यावर रागावू शकतो.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप पैसे खर्च करावे लागतील, त्यामुळे थोडं सावध राहा आणि पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरू शकता, जिथे तुम्ही खूप मजा कराल. मौजमजा करण्यासोबतच तुम्हीही वेळेचे भान ठेवलं तर बरं होईल. आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चढ-उताराचा असेल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमचा बॉस तुमची तुमच्या कामाच्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बदली करेल, परंतु तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पगार मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.  

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही थोडा त्रासदायक ठरू शकतो, त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे विचारपूर्वक गुंतवावे किंवा एखाद्या तज्ञाच्या सल्ल्याने गुंतवावे.  

विद्यार्थी (Student) - आज अभ्यासावर लक्ष द्या. जर तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी तुमच्यावर रागावलं असेल तर त्यांना जास्त नाराज न करण्याचा प्रयत्न करा. काही काळानंतर सर्व परिस्थिती सामान्य राहील.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. आज गाडी चालवताना थोडी काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते.

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाईल. तुमच्यावर जास्त कामाचा बोजा राहणार नाही, ज्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज व्यवसायात नुकसान सहन करावं लागू शकतं, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं, रागाच्या भरात कोणाशीही वाईट बोलू नये.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुमच्या डोळ्यांसंबंधित किंवा दातांच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. थंड पदार्थ खाणं टाळा.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीचे मार्ग सापडतील. तुम्ही तुमच्या कामात मेहनत घेतली तर तुमचा बॉस तुमच्यावर खूश असेल.

व्यवसाय (Business) - आज तुमचा व्यवसाय मध्यम असेल, तुम्हाला जास्त नफा होणार नाही आणि तुमचं नुकसानही होणार नाही.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, आज विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी एकाग्रतेने अभ्यास करतील, ज्यामुळे त्यांना परीक्षेत यश मिळू शकेल.

आरोग्य (Health) - आज आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागेल. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते, त्यामुळे तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर काम करताना चष्मा लावलाच पाहिजे.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मेहनतीने काम केल्यास तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं आणि तुमचा पगारही वाढू शकतो.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात आळशीपणा करू नका. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी कठोर परिश्रम केले तर तुम्हाला प्रगती करता येईल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाकडे खूप लक्ष देणं आवश्यक आहे.

कौटुंबिक (Family) - आज तुम्ही खरेदीसाठी बाजारात जाऊ शकता, परंतु तुम्ही खूप जास्त पैसे खर्च करू शकता, त्यामुळे तुम्ही हात आखडते घेतले तर बरं होईल, अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.  

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकता, तुम्हाला चांगली संधी मिळेल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पगारही मिळू शकेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्हाला भरपूर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि आळस सोडावा लागेल, तरच तुमचा व्यवसाय प्रगती करू शकेल. 

विद्यार्थी (Student) - आज मुलं कोणत्या ना कोणत्या विषयावरुन तणावामुळे चिडचिड करतील. म्हणूनच तुम्ही जास्त रागावणं टाळलं पाहिजे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे.  

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, डोकेदुखीमुळे तुम्हाला त्रास होईल. तीव्र वेदना झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मायग्रेनची तपासणी करा. आज तुम्हाला जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे तुम्हाला ताप किंवा डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नये.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या इच्छेनुसार कोणतंही काम झालं नाही तर जास्त चिडू नका. आज तुमच्या ऑफिसशी संबंधित एखाद्या गोष्टीचा तणाव असेल तर तुम्ही आज थोडं शांत राहा, तरच तुमची सर्व कामं लवकर पूर्ण होऊ शकतात. आज तुम्हाला काही कारणाने नोकरी बदलावी लागू शकते.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, ज्यामुळे तुम्ही खूप चिंतित होऊ शकता.

कौटुंबिक (Family) - आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला जाण्याची योजना आखू शकता, जिथे तुम्हाला खूप मजा येईल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुमचं आरोग्य सामान्य असेल, परंतु तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची तुम्हाला थोडी काळजी वाटेल. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीबद्दल थोडं सतर्क राहा, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आजचा दिवस तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगला असेल. 

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात, जेणेकरून तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेऊ शकता. आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्यांना सर्व विषयांवर समान लक्ष केंद्रित करावं लागेल. तुमच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, श्वसनाशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करुन घ्या, अन्यथा तुमच्या समस्या खूप वाढू शकतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Scorpio March Horoscope 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांनी नवीन महिन्यात घ्यावी काळजी; आरोग्यात जाणवेल चढ-उतार, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 17 मार्चचा दिवस भाग्यशाली! 'या' 5 राशींवर असणार भगवान हनुमानाची कृपा, समोर आलेलं संकट दूर करतील बजरंगबली
17 मार्चचा दिवस भाग्यशाली! 'या' 5 राशींवर असणार भगवान हनुमानाची कृपा, समोर आलेलं संकट दूर करतील बजरंगबली
Budh Gochar 2026 : 25 मार्चनंतर पलटणार नशीब! बुध ग्रहाच्या बदलत्या चालीमुळे 'या' 3 राशी जगतील राजासारखं जीवन, नोकरी, पैसा, करिअर सगळंच...
25 मार्चनंतर पलटणार नशीब! बुध ग्रहाच्या बदलत्या चालीमुळे 'या' 3 राशी जगतील राजासारखं जीवन, नोकरी, पैसा, करिअर सगळंच...
Chaturgrahi Yog 2026 : कुंभ राशीत 4 ग्रहांची युती! आज संध्याकाळपासूनच ‘या’ 3 राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, मिळणार मोठ्ठा लाभ
कुंभ राशीत 4 ग्रहांची युती! आज संध्याकाळपासूनच ‘या’ 3 राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, मिळणार मोठ्ठा लाभ
Weekly Lucky Zodiac Signs : मार्चचा तिसरा आठवडा सुरु...पुढचे 7 दिवस 5 राशींची मज्जा! पैसा, नोकरी आणि संपत्तीतही भरभराट
मार्चचा तिसरा आठवडा सुरु...पुढचे 7 दिवस 5 राशींची मज्जा! पैसा, नोकरी आणि संपत्तीतही भरभराट

व्हिडीओ

Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Embed widget