Scorpio March Horoscope 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांनी नवीन महिन्यात घ्यावी काळजी; आरोग्यात जाणवेल चढ-उतार, मासिक राशीभविष्य जाणून घ्या
Scorpio Monthly Horoscope March 2024: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मार्च महिना कसा राहील? मार्च महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.
Scorpio March Horoscope 2024 : वृश्चिक (Scorpio) राशीच्या लोकांसाठी मार्च महिना चांगला जाणार आहे. मात्र, या महिन्यात आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चढ-उतार जाणवतील. कामाच्या बाबतीत महिना सामान्य राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असेल. प्रवासातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी व्यवसायिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने मार्च महिना कसा असेल? सविस्तरपणे जाणून घेऊया.
वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Job Career Horoscope March 2024)
मार्च महिना नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांसाठी 13 मार्चपर्यंत खूप शुभ ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरी-व्यवसायात चांगले परिणाम पाहायला मिळतील. महिन्याच्या मध्यात व्यवसायात काही प्रमाणात नफा-तोटा होऊ शकतो. पण महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या कामात थोडा कंटाळा जाणवेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मार्च महिना फायद्याचा ठरेल.
विद्यार्थ्यांसाठी महिना कसा? (Student Monthly Horoscope March 2024)
वृश्चिक राशीत मंगळाच्या चतुर्थ स्थानामुळे 14 मार्चपर्यंतचा काळ विद्यार्थ्यांसाठी चांगला असेल. विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांत त्यांना फळ मिळेल. उच्च शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल.
वृश्चिक राशीचं मार्चमधील आरोग्य आणि प्रवास जीवन (Scorpio Health And Travel March 2024)
गुरू-केतूच्या षडाष्टक दोषामुळे मार्च महिना आरोग्याच्या दृष्टीने चढ-उतारांनी भरलेला राहील. तुम्ही व्यायाम, योगा करत राहा, अन्यथा आरोग्याच्या समस्या जाणवतील. प्रवासातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. योगाच्या मदतीने तुम्ही तुमचा मानसिक ताण कमी करू शकता.
वृश्चिक राशीसाठी उपाय (Scorpio Remedies March 2024)
8 मार्च, महाशिवरात्री :- भोलेनाथाला शुद्ध जल अर्पण करा, नंतर तूपाचा दिवा लावून पूजा करावी. "ओम नमो भगवते रुद्रय" या मंत्राचा जप करा .
24 मार्च, होळी :- होलिका दहनात 3 चमचे पिवळी मोहरी अर्पण करावी. दुसऱ्या दिवशी 24 चिमूट होलिका दहन भस्म घरी आणून कपड्यात बांधून ठेवावा, यामुळे सौभाग्य प्राप्त होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: