Horoscope Today 25 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; अडकलेली कामं लागणार मार्गी, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 25 June 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 25 June 2024 : पंचांगानुसार, आज 25 जून 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
कौटुंबिक मतभेदांना वाचा फुटेल, यावेळी सामंजस्याचे धोरण स्वीकारणे हिताचे ठरेल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक निर्णय घेताना ज्यामध्ये पैसा मिळवू शकाल अशी शिक्षणाची शाखा निवडणे आवश्यक आहे.
मिथुन (Gemini Horoscope Today)
अति भावनाप्रधानता काही वेळेस घातक ठरेल. अशावेळी मानापमानाच्या कल्पना जरा जास्तच टोकदार होतील.
कर्क (Cancer Horoscope Today)
स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये पुसटशी लक्ष्मण रेषा असते, हे लक्षात ठेवा, त्याप्रमाणे आचरण ठेवा.
सिंह (Leo Horoscope Today)
सरकार दरबारची कामे मार्गी लागतील. अपेक्षाभंगाच्या दुःखाला सामोरे जावे लागण्याची शक्यता.
कन्या (Virgo Horoscope Today)
अविवाहित कल्पनांमुळे कामाचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे. कुठेही अंधविश्वास ठेवू नका.
तूळ (Libra Horoscope Today)
पैशाचा अतिलोभ गाळात घालेल. कष्ट टाळून श्रीमंत होण्याचा मार्ग अवलंबू नये.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
भावंडांचे सहकार्य मिळेल, परंतु त्यांच्या अवस्था मागण्यांचाही विचार करावा लागेल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
ज्यांचा व्यवसाय नोकरी बोलण्याची संबंधित आहे त्यांना अनेक संधी चालून येतील व त्यातून त्यांना पैसा मिळेल.
मकर (Capricorn Horoscope Today)
वडिलांचे, ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. नवनवीन कल्पना जन्म घेतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी आकाशाला गवसणी घालण्याचे बेत आखाल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
समस्या या अनेकदा संधी असू शकतात, यावर विश्वास ठेवलात तर अडचणी सहज मागे टाकून द्याल.
मीन (Pisces Horoscope Today)
तुमच्या कल्पना इतरांना थोड्या चाकोरीबाहेरच्या वाटल्या तरी नंतर ते सर्वजण तुमच्याशी सहमत होतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: