एक्स्प्लोर
Surya Grahan 2025 : सूर्यग्रहणाच्या दिवशी 'या' वस्तूंचं करा दान ;नकारात्मक प्रभाव होतील दूर!
Surya Grahan 2025 : हिंदू धर्मात सूर्यग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी शुभकार्य, पूजा आणि विधी करणं आवश्यक मानलं जातं.
Surya Grahan 2025
1/9

सूर्यग्रहणाचा अनेकदा नकारात्मक प्रभाव अनेकदा पडण्याची शक्यता असते. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहणात काही गोष्टींचं दान करणं शुभ मानलं जातं.
2/9

धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण काळात वातावरणात नकारात्मतक शक्ती सक्रिय होऊ शकतात. या नकारात्मक शक्ती कमी करण्यासाठी जीवनात सुख शांती आणण्यासाठी दान करणं गरजेचं आहे.
3/9

अनेकदा व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य किंवा चंद्राशी संबंधित दोष असतात. ग्रहण काळात सूर्याशी संबंधित वस्तूंचं दान केल्याने दोषांपासून मुक्ती मिळते.
4/9

सूर्यकाळात कोणत्या वस्तूंचं दान करणं शुभ असतं जाणून घ्या.
5/9

गहू आणि गूळ - या दोन्ही गोष्टी सूर्याचं प्रतिनिधीत्व करतात. हे दान केल्याने तुमच्या मान-सन्मानात वाढ होते. तसेच, नोकरी-व्यवसायात प्रगती होते.
6/9

तांब्याची भांडी - तांबे हे सूर्याचं धातू मानलं जातं. तांब्याच्या नाण्याचं दान केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते.
7/9

लाल वस्त्र - लाल रंग हा सूर्याचा प्रिय रंग आहे. लाल वस्त्र, विशेषत: गरीब आणि गरजूंना दान केल्याने व्यक्तीच्या आत्मविश्वासात वाढ होते.
8/9

ग्रहण काळात केलेल्या दानाने व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतो. तसेच, दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
9/9

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 16 Sep 2025 01:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























