Horoscope Today 24 August 2023 : मेष, कर्क, धनुसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 24 August 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 24 August 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांचा जोडीदाराशी वाद होऊ शकतो. तर, वृश्चिक राशीच्या लोकांना कुटुंबीयांबरोबर धार्मिक स्थळाला जाण्याची संधी मिळेल. एकूणच मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार नेमका कसा असेल? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
मेष
मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस तणावपूर्ण राहील. दिवसभर कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या जोडीदाराशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. बोलण्यात संयम ठेवा. कोणाच्याही विनाकारण बोलण्यात गुंतू नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमचे अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. मुलांकडून तुमचे मन समाधानी राहील.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा असेल. तुम्हाला नवीन ऑर्डर मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांच्या वतीने तुमचे मन समाधानी राहील.मुलांच्या करिअरबाबत तुम्ही आनंदी असाल. मित्रांचे सहकार्य आज तुमच्यासाठी फार मोलाचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ फार महत्त्वाचा असणार आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असू शकतो. आज तुम्ही मानसिक आणि शारीरिक तणावामुळे त्रस्त होऊ शकता. आज तुमचे आरोग्य सामान्य राहील. नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज मुलाच्या बाजूने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल खूप आनंदी असाल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमची सर्व रखडलेली सर्व कामे हळूहळू पूर्ण होतील.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संघर्षाचा असेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ असाल. आज तुमच्या जोडीदाराबरोबर कोणत्याही विषयावर वाद होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन मित्र भेटतील. आज कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा, ती व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. मोठ्यांचा आदर करा, कोणाचाही अनादर करू नका.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात तुमचे करिअर करायचे आहे. त्यात तुम्हाला यश मिळेल. मुलांच्या बाजूने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसह धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. हा प्रवास केल्याने मनाला खूप शांती मिळेल. तुमच्या तब्येतीबद्दल गाफील राहू नका. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. आज सकाळपासूनच तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत असेल. तुम्ही तुमच्या घरातील छोट्या-छोट्या गरजा पूर्ण कराल. यामुळे तुमचे कुटुंबीय खूप आनंदी होतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. मुलांकडून तुमचे मन समाधानी राहील. पण नोकरीबद्दल तुमचे मन थोडेसे चिंतेत राहील. तुमच्या अधिकार्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. ज्येष्ठांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कोणत्याही व्यक्तीबद्दल तुमच्या मनात कोणतीही नकारात्मकता राहणार नाही. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह चांगला वेळ घालवू शकता. तुमचे वैवाहिक जीवन चांगले असेल. मुलाच्या बाजूनेही तुमचे मन समाधानी राहील. आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. संध्याकाळी जुन्या मित्राची भेट होऊ शकते. ज्याला भेटून तुमचे मन खूप प्रसन्न होईल. तुमच्या मित्राबरोबर बसून तुम्ही कोणत्याही खास कामावर चर्चा करू शकता.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज तुमचा कुटुंबीयांबरोबर चांगला वेळ जाईल. वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायात काही रखडलेल्या योजना सुरू केल्यात तर तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळेल. आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचे जवळच्या लोकांशी संबंध बिघडू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन शिकण्याची संधी मिळेल.
धनु
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी तणावपूर्ण जाणार आहे. तुमच्या काही योजना वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही तणावात राहाल. तुमच्या स्वभावात कोणत्याही कारणाने चिडचिडेपणा येऊ शकतो. आज कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. संध्याकाळचा वेळ मित्रांसह चांगला जाईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला मित्रांसह धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. आज तुमचे मन भक्तीमध्ये गुंतलेले असेल, जे पाहून घरातील सदस्यही आनंदी होतील. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवनात गोडवा असेल. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या करिअरबाबत तुम्ही कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतल्यास, तो घेण्यापूर्वी ज्येष्ठ सदस्यांशी बोला. नोकरदार वर्गाच्या लोकांचे आज कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. व्यावसायिक लोकांनाही कामात चांगला फायदा मिळेल. आज आरोग्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे.
मीन
राशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र असेल. आज व्यवसायात मनमानी करू नका. विद्यार्थी आज क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. आज तुमच्या भावा-बहिणींबरोबर चांगले संबंध राहतील. मित्रांसोबत काही करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या नुकसानामुळे तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल. तुमच्या घरी नातेवाईकांची ये-जा सुरू राहील. अविवाहित लोकांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :