Horoscope Today 23 August 2025: आजची श्रावण अमावस्या 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवांच्या कृपेने धनलाभाचे योग, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 23 August 2025: आजचा शनिवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 23 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 23 ऑगस्ट 2025, आजचा वार शनिवार आहे. आज श्रावण अमावस्या असल्याने आजचा दिवस खास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज आपल्या आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात या परंतु त्यामुळे कामाकडे दुर्लक्ष होत नाही ना, याची काळजी घ्यावी लागेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल, महिलांना वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कोणाला पाठीशी घालणार नाही आणि कोणत्या गोष्टीचा अतिरेकही करणार नाही
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्या स्वभावामुळे काही जवळच्या लोकांचा रोष ओढवला जाण्याची शक्यता आहे
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज व्यवसायात पूर्वी केलेल्या कामांचा लाभ होणार आहे, जुनी आणि वसूल होतील परंतु ती सहज वसूल न झाल्यामुळे थोडी संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील, परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज घरातील लांब गेलेल्या व्यक्ती घरी परत येतील, त्यामुळे गाठीभेटी होऊन घरातील ताण-तणाव थोडे कमी होतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांना जोडीदाराच्या स्वभावाचा अंदाज घेऊन वर्तणूक ठेवावी लागेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज बऱ्याच गोष्टींमध्ये समतोल साधल्यामुळे घरात आणि बाहेरही तुमच्या आसपास लोकांचा गराडा राहील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या मताच्या बाहेर कोणी जाणार नाही, नोकरीमध्ये वरिष्ठांनी लाdलेल्या नवीन जबाबदाऱ्यांचा त्रास होईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज व्यवसायात नको त्या माणसांची मनधरणी करावी लागल्यामुळे थोडा मानसिक त्रास होईल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज वडीलधाऱ्या व्यक्तींशी मतभेद झाले तरी, टोकाची भूमिका घेणार नाही पैशाची परिस्थिती सुधारेल.
हेही वाचा :
Lucky Zodiac Signs: 23 ऑगस्ट तारीख अद्भूत! 'या' 5 राशींवर धनवर्षा, सौभाग्य लाभणार, 3 ग्रहांची जबरदस्त महायुती होतेय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















